टी२० विश्वचषक जसजसा जवळ येत चालला आहे तसतसे भारत संघात अनेक बदल करू पाहात आहे. त्यातील प्रमुख बदल म्हणजे सलामीवीर. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या (WIvsIND) दौऱ्यावर आहे. सुरू असलेल्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत सूर्यकुमार यादव सलामीला आला. यामुळे आता भारताकडे टी२०मध्ये सद्यस्थितीत सलामीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सलामीला येत सगळ्यांना आश्चर्यचकित केले. त्याने छोटी पण उत्तम खेळी केली. हा सामना भारताने ६८ धावांनी जिंकला. केएल राहुल दुखापतीमुळे या मालिकेस मुकला आहे. तसेच त्याने २०२२मध्ये एकही आंतरराष्ट्रीय टी२० सामान खेळला नाही. यामुळे अनेक खेळाडूंनी सलामीला फलंदाजी केली आहे. त्यामुळे संघात सध्या सलामीसाठी सहा पर्याय उपलब्ध आहेत.
रिषभ पंत, संजू सॅमसन, रोहित शर्मा (Rohit Sharma), इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुड्डा यांनी सलामीला येऊन फलंदाजी केली आहे. तसेच विराट कोहली यालाही सलामी फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. तर सलामीला आलेल्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली ते पाहुया.
रोहितचा फलंदाजी क्रम निश्चित आहे. तर इशानने १३ टी२० सामन्यात सलामीला येताना ३ अर्धशतक केले. तसेच ऋतुराजने ६ सामन्यात तर संजूने २ सामन्यात प्रत्येकी एक-एक अर्धशतक केले आहे. त्याचबरोबर दीपकने एका सामन्यात नाबाद ४७ धावा केल्या.
तसेच रोहितने वेस्ट इंडिज विरुद्ध ६४ धावा केल्या. त्याचे हे या वर्षातील पहिले आंतरराष्ट्रीय टी२० अर्धशतक ठरले. त्याने मागील ९ सामन्यात २७च्या सरासरीने २३९ धावा केल्या.
राहुल टी२०मध्ये सलामीला येताना आतापर्यंत सर्वोत्तम ठरला आहे. त्याने आयपीएल २०२२मध्ये २ शतक करताना ६०० पेक्षा अधिक धावा केल्या. तर टी२० विश्वचषकाआधी त्याला एशिया कप आणि खेळल्या जाणाऱ्या द्विपक्षीय मालिकांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. टी२० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कितीही सामन्यात फ्लॉप ठरला तरी पंतच ठरलाय अव्वल! केलीय अशी कामगिरी जी कुणालाच नाही जमली
दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी करणार ‘ही’ खास तयारी! खुद्द विंडीजच्या कर्णधारानेच सांगितलंय
टीम इंडियाचा ‘हा’ स्टार खेळाडू मैदानात उतरण्यासाठी सज्ज, अमित मिश्राने शेअर केली आनंदवार्ता!