भारताचा एक संघ एशिया कप (Asia Cup) स्पर्धा खेळणार आहे, तर एक संघ झिम्बाब्वे विरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ काही दिवसांतच झिम्बाब्वेच्या(ZIMvsIND) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन (Shikahr Dhawan) करणार आहे. तीन वनडे सामने खेळल्या जाणाऱ्या या दौऱ्यातील पहिला सामना १८ ऑगस्टला खेळला जाणार आहे. एशिया कपच्या भारतीय संघात वरिष्ठ खेळाडू असल्याने झिम्बाब्वेच्या दौऱ्यात राहुल त्रिपाठीला वनडे पदार्पण करण्याची संधी आहे.
भारतीय संघाला झिम्बाब्वेच्या दौऱ्यात अनेक महत्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याच्यासारख्या जबरदस्त फलंदाजाची आवश्यकता आहे. भारतीय संघाने मागील काही दौऱ्यात फलंदाजी क्रमाबाबत वेगवेगळ्या कल्पना वापरल्या आहेत. यामुळे राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्याने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) काही सामन्यांमध्ये मध्यम फळीत फलंदाजी केली होती. यामध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती.
इनसाईडस्पोटर्सला संघ निवड समितीच्या एका सदस्याने सांगितले, “आम्हाला वनडेमध्ये एका वेगवान फलंदाजांची आवश्यकता आहे. वनडे विश्वचषकासाठी एका वर्षापेक्षा कमी वेळ असल्याने, अशात सर्वप्रथम संघाची बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यावर आमचा जोर आहे. राहुल त्रिपाठी हा एक असा खेळाडू आहे जो धावफलक हलता ठेवतो. यामुळे तुम्ही त्याला झिम्बाब्वेच्या दौऱ्यात खेळताना पाहू शकता.”
त्रिपाठीने आयपीएल २०२२च्या हंगामात सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना १४ सामन्यांत ४१३ धावा केल्या. त्यावेळी त्याची सरासरी ३७.५५ आणि स्ट्राईक रेट १५८.२४ होता. या कामगिरीमुळे त्याची आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघात निवड झाली होती. मात्र या टी२० दौऱ्यातील त्याला एकाही खेळण्याची संधी मिळाली नाही. सद्यस्थितीत भारताचे अनेक खेळाडू झिम्बाब्वेच्या दौऱ्यात नसल्याने त्याला संघात पदार्पण करण्याची संधी आहे. या दौऱ्यात त्याने उत्तम कामगिरी केली तर त्याची २०२३च्या वनडे विश्वचषकासाठी संघात निवड होण्याचीही शक्यता आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू:
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेंडू षटकारासाठी बाउंड्रीपार जाणारच होता, पण हेटमायरने हवेत झेपावत पकडला झेल; पाहा तो अद्भुत कॅच
मराठीत माहिती- क्रिकेटर यशपाल शर्मा