---Advertisement---

केएल राहुलमुळे विंडीजच्या दौऱ्यात भन्नाट कामगिरी करण्याऱ्या खेळाडूचा फलंदाजी क्रम धोक्यात!

Shikhar Dhawan, KL Rahul
---Advertisement---

भारतीय संघ झिम्बाब्वेला पोहोचला आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध झिम्बाब्वे (ZIMvsIND) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना १८ ऑगस्टला हरारे येथे खेळला जाणार आहे. यामध्ये भारत केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तो या दौऱ्यात अनुभवी फलंदाज शिखर धवनसोबत सलामीला येऊ शकतो. जर असे झाले तर युवा फलंदाज शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला यावे लागेल. भारतीय संघ १८, २० आणि २२ ऑगस्टला झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सामने खेळणार आहेत. 

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. यासाठी शुबमन गिल (Shubman Gill) याची संघात निवड जवळपास अशक्यच आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात जर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तर एशिया कपआधी केएल राहुल (KL Rahul) याला सर्वाधिक वेळ खेळपट्टीवर वेळ व्यतित करण्याची संधी मिळणार आहे.

राहुल मोठ्या कालावधीनंतर संघात परतत आहे. भारताकडून तो फेब्रुवारीनंतर पहिला सामना खेळणार आहे. त्याचबरोबर त्याची एशिया कपच्या संघात निवड झाली आहे. एशिया कप २७ ऑगस्टपासून युनायटेड अरब अमिराती येथे खेळला जाणार आहे.

झिम्बाब्वेच्या दौऱ्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) नाहीतर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आहेत. तर लक्ष्मण हे द्रविड यांनी नियोजित केलेल्या योजनेप्रमाणे काम करणार आहेत.

गिलने वेस्ट इंडिज दौऱ्यात वनडेमध्ये सलामीला येताना उत्तम खेळी केली आहे. त्याने तीन सामन्यात अनुक्रमे ६४, ४३ आणि नाबाद ९८ धावा केल्या होत्या. त्याच्या या उल्लेखनीय खेळीने तो या दौऱ्यात मालिकावीर ठरला होता. त्याच्या या जबरदस्त फॉर्ममुळे तो सलामीला खेळणार की एशिया कपमुळे त्याच्या फलंदाजीचा क्रम बदलणार याबाबत राहुल काय निर्णय घेणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.

तसेच भारतीय संघनिवड अधिकाऱ्यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. ते वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी खेळाडूंकडून तयारी करून घेत आहेत. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात गिलने चांगली कामगिरी केली मात्र तो कदाचित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी येण्याची दाट शक्यता आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ-
भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

स्वातंत्र्यदिन विशेष: १९८३ सालचा वर्ल्डकप ते २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, वाचा भारतीय क्रिकेटमधील सोनेरी क्षण

१५ ऑगस्टला भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांचा लागलाय असा निकाल, फक्त एकदा मिळालाय विजय

… आणि तेव्हापासून धोनीने हेल्मेटवरील तिरंगा हटविला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---