---Advertisement---

‘आम्ही भारताला २-१ ने हरवू’; झिम्बाब्वेच्या खेळाडूची मालिकेआधीच गर्जना

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 11:15 PM
zimbabwe-team
---Advertisement---

भारताविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ व खेळाडू खूप उत्सुक आहे. संघाचा युवा फलंदाज इनोसंट कायाने मालिकेपूर्वी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत विजयाची नोंद करण्यात आपल्या संघाला यश मिळेल, असे त्याला वाटते. बांगलादेशला नुकतेच पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे.

बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत शानदार खेळ करून प्रसिद्धीझोतात आलेला काया म्हणाला,

“ही मालिका २-१ अशा फरकाने आमच्या बाजूने असेल. वैयक्तिक कामगिरीबाबत विचाराल तर, मला मालिकेत सर्वाधिक धावा करायच्या आहेत. शतकही झळकावायचे आहे. सध्या तरी हेच माझे लक्ष आहे.”

भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीचा यजमान संघाला फायदा होऊ शकतो, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. काया म्हणाला की, “विराट, रोहित किंवा रिषभ पंत नसतानाही हा मजबूत संघ आहे. मला माहित आहे की, झिम्बाब्वेमध्ये येणारा हा संघ मजबूत असून, त्यांच्याविरुद्ध खेळणे सोपे आहे असे सांगून आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. मला खात्री आहे की, आम्ही त्यांच्याविरुद्ध चांगला खेळ करू.”

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ-

रेगिस चकाब्वा (कर्णधार), रायन बर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवान्स, ल्यूक जोंगवे, इनोसंट काया, ताकुदज्वानाशे कॅटानो, क्लाइव मदांडे, वेस्ली मधेवेरे, तदीवानाशे मारुमनी, जॉन मसारा, टोनी मुन्योंगा, रिचर्ड नगारवा, विक्टर न्याची, सिकंदर रजा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड टिरिपानो.

महत्वाच्या बातम्या-

महिला फुटबॉल लीगसाठी अस्पायर एफसी सज्ज

‘या’ चारपैकी एक खेळाडू व्हायला हवा टीम इंडियाचा कर्णधार’! दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाजाचे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---