भारतीय संघाने मागील काही मालिकांमध्ये वेगवेगळे कर्णधार नेमले होते. या वर्षात आतापर्यंत भारतीय संघाने ७ खेळाडूंच्या नेतृत्वाखाली मालिका खेळल्या आहेत. केएल राहुल संघात परतल्याने कदाचित आता कर्णधार बदल्याची वेळ येणार नाही. रोहित शर्मा भारताचा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील नियमित कर्णधार आहे. तर त्याच्यानंतर कोण असणार कर्णधार यासाठी भारताच्या माजी क्रिकेटपटूने नाव सुचविले आहे.
भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यानंतर कोण असेल भारताचा कर्णधार? या प्रश्नाचे उत्तर सांगताना काही नावे सुचविली आहेत. त्याने कर्णधारपदाच्या दावेदारीत केएल राहुल (KL Rahul), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), रिषभ पंत यांची नावे घेतली आहेत. तसेच त्याने जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) याचा देखील समावेश केला आहे. बुमराहमध्ये कर्णधाराची गुणवत्ता आहे यामुळे तो चांगला कर्णधार ठरेल, असे स्पष्टीकरण दिले आहे.
“मला वाटते रोहितनंतर भविष्यात पूर्णवेळ कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या, रिषभ पंत आणि केएल राहुल प्रमुख दावेदार असतील. हार्दिक हा कर्णधार म्हणून आयपीएल जिंकला आहे. विशेष म्हणजे तो दबावाच्या स्थितीत शांत राहून नेतृत्व करतो. पंत आणि राहुल यांना देखील नेतृत्व करण्याचा अनुभव आहे,” असे पार्थिवने म्हटले आहे.
बुमराह पण कर्णधाराच्या पदासाठी योग्य आहे. त्याच्याविषयीही बोलताना पार्थिव पुढे म्हणाला, “बुमराहने माझ्या नेतृत्वाखाली गुजरातकडून पदार्पण केले होते. मला त्याच्या गोलंदाजीचे कौशल्य चांगले माहित आहे. तो खेळपट्टीवर टिकून असलेल्या फलंदाजाची विकेट काढण्यात हुशार आहे. यावरून तो मैदानावरील निर्णय घेण्यात किती सक्षम आहे, हे कळून येते. त्याच्या नेतृत्वाखाली नुकतेच भारतीय संघाला कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्याच्यामध्ये कर्णधार बनण्याची क्षमता आहे.”
विराट कोहली याने कर्णधारपद सोडल्यापासून रोहित नियमित कर्णधार बनला. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ पंत, हार्दिक, शिखर धवन, राहुल, बुमराह यांच्या नेतृत्वाखाली खेळला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेगाचा बादशहा नॉर्किएला मिळाला नवा संघ; युवा प्रिटोरियसचेही उजळले नशीब
रिषभ-उर्वशी वाद| पंतची आणखी एक नवी पोस्ट चर्चेत; आता म्हणतोय…
बाबर आझमचं टेन्शंनं वाढलंय! पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी ‘या’ देशाने जाहिर केलाय मजबूत संघ






