भारत विरुद्ध झिम्बाब्वे खेळल्या जाणाऱ्या चाैथ्या टी20 भारताने 10 विकेट्सनी विजय मिळवला. हरारे येथे झालेल्या 5 सामन्याच्या टी20 मालिकेत भारताने चाैथ्या सामन्यात यजमान संघाचा दारुण पराभव केला. यासह ही मालिका 3-1 ने आपल्या खिशात टाकली. तर पाचवा आणि शेवटचा सामना आज (14 जुलै) होणार आहे.
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शानदार कामगिरी करत मालिका आपल्या नावे केली. चाैथ्या टी20 सामन्यात गिलने टाॅस जिंकूम प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या झिम्बाब्वेने 20 षटकात 152 धावांचा सन्मानजनक लक्ष्य भारतासमोर ठेवले. संघाकडून सिंकदर रजाने सर्वाधिक 46 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत खलील अहमदने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
धावांचा पाठलाग करताना यशस्वी आणि शुबमन गिलने संघासठी विकेट नगमावता अप्रतिम फलंदाजी करत धावांची पाठलाग केला. ज्यामध्ये यशस्वी जयस्वालने 93 धावांची तर शुबमन गिलने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. पण तरीही चाहत्यांनी गिलला आता व्हिलन बनवलं आहे आणि यशस्वीबरोबर त्याने नेमकं काय केलं ते देखील सांगितलं आहे.
यशस्वी आणि गिल यांनी शतकी सलामी दिली. त्यावेळी यशस्वीने अर्धशतक ठोकले होते. पण गिलचे अर्धशतक अद्याप झाले नव्हते. यशस्वी यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत होता. त्यामुळे यशस्वी हा सामना लवकर संपवणार, असे दिसत होते. भारताला विजयासाठी जेव्हा 23 धावांची गरज होती, तेव्हा यशस्वी हा 83 धावांवर खेळत होता आणि त्याला शतक पूर्ण करायला 17 धावांची गरज होती. त्यामुळे आता यशस्वीचे शतक होणार, असेच सर्वांना वाटत होते.
Why do we need selfish players like Shubman Gill who can’t play for the team.
I had a doubt on him since he made Rohit Sharma runout against Afghanistan.
Abhishek Sharma and Yashasvi Jaiswal deserve a good captain.#IndvsZim pic.twitter.com/CNYABwqp1i
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) July 13, 2024
गिलने त्यावेळी त्याचा घात केला. कारण गिलने यशस्वीला त्यानंतर जास्त फलंदाजी करण्याची संधीच दिली नाही. भारताने हा विजय 15.2 षटकांतच मिळवला. त्यामुळे भारताकडे चेंडूही जास्त होते, त्यामुळे घाई करण्याची कोणतीच गरज नव्हती. पण गिलने स्वत:कडे जास्त स्ट्राइक ठेवली आणि त्याने आपले अर्धशतक झाल्यावरही फटकेबाजी केली. त्यामुळे यशस्वीचे शतक हुकले आणि चाहते गिलवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चाहते आता गिलला स्वार्थी (Selfish) असल्याच आरोप करत आहेत. यशस्वीने यावेळी अशी धमाकेदार फटकेबाजी केली की, सर्व जण त्याच्या फलंदाजीवर फिदा झाले होते. यशस्वी आता शतक झळकावणार, असे सर्वांनाच वाटत होते. पण गिलने मात्र यशस्वीचे शतक होऊ दिले नाही, अशी भावना चाहत्यांच्या मनात आहे.
महत्तवाच्या बातम्या-
WCL 2024, भारताचा पाकिस्तानला दणका, टीम इंडियाचा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ट्रॉफीवर कब्जा
आयपीएल 2025 पूर्वी मोठे फेरबदल, रिकी पाँटिंग यांनी दिल्ली कॅपिटल्सचं मुख्य प्रशिक्षकपद सोडलं
शुबमन-जयस्वालची विस्फोटक खेळी! भारताविरुद्ध झिम्बाब्वेचा दारूण पराभव