एप्रिल महिन्याच्या अखेरपासून भारतीय कुस्तीपटू नवी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते. शेवटी रविवारी (28 मे) कुस्तीपटूंचे हे आंदोलन उठवण्यात आले. कुस्तीपटूंसोबत झालेल्या कारवाईवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. तसेच खेळाडूंनी आपले मेडल गंगा नदीत सोडण्याचा इशारा दिला याच पार्श्वभूमीवर आता भारताला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या सर्व खेळाडूंनी एक निवेदन जारी करत या खेळाडूंना थोडा संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर या कुस्तीपटूंनी थेट आपली सर्व पदके गंगा नदीत फेकण्याचा इशारा दिला होता. मंगळवारी (30 मे) हरिद्वार येथे हे खेळाडू आपले पदक फेकण्याच्या तयारीत होते. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर, कुस्तीपटूंनी सरकारला पाच दिवसाचा अल्टीमेटम दिला. याच मुद्द्यावर भारताला 1983 मध्ये पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या खेळाडूंनी निवेदन देत म्हटले,
‘आमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंसोबत झालेल्या गैरवर्तनामुळे आम्ही दुःखी आणि व्यथित झालो आहोत. ते त्यांच्या कष्ट गंगा नदीत फेकण्याचा विचार करत आहेत. या परिस्थितीबद्दल आम्हाला सर्वात जास्त चिंता वाटते. त्या पदकांमध्ये वर्षानुवर्षे केलेले परिश्रम, त्याग, जिद्द आणि हिंमत यांचा समावेश होतो. ती पदके केवळ त्यांचीच नसून देशाची शान आणि आनंद आहेत. आम्ही त्यांना या प्रकरणी कोणताही घाईघाईने निर्णय न घेण्याचे आवाहन करतो. त्यांच्या तक्रारी लवकरात लवकर ऐकून त्यांचे निराकरण केले जाईल अशी आशा आहे.”
कपिल देव यांच्या नेतृत्वातील या संघाने 1983 मध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करत पहिले विश्वविजेतेपद पटकावले होते. या संघात सुनील गावसकर, रवी शास्त्री, रॉजर बिन्नी, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, कीर्ती आझाद इत्यादी दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्यावर एफआयआर नोंद झाली असली तरी, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. याच मुद्द्यावर खेळाडू आंदोलन करताना दिसतायेत.
(India 1983 World Cup Winners Team Supports Wrestlers Protest)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
मुंबई भारी की चेन्नई? भर रस्त्यात भिडले ब्राव्हो-पोलार्ड, असा लागला निकाल
आनंदाची बातमी: गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धोनीला डिस्चार्ज, ‘इतक्या’ दिवसांत पुन्हा धावू लागणार