सध्या न्यूझीलंड ए क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. इंडिया ए संघाविरुद्ध त्यांची तीन चारदिवसीय प्रथमश्रेणी सामन्यांची मालिका बेंगलोर येथे पार पडली. बेंगलोर येथे झालेला अखेरचा सामना इंडिया ए संघाने 113 धावांनी जिंकत मालिका आपल्या नावे केली. आता उभय संघांमध्ये चेन्नई येथे तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल.
India A Won by 113 Run(s) #IndAvNzA #IndiaASeries Scorecard:https://t.co/SK5tF43NOb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 18, 2022
मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित राहिले होते. त्यामुळे अखेरच्या सामन्यात विजयासाठी दोन्ही संघांनी प्रयत्न केले. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेलेल्या सामन्यात इंडिया ए संघाचा कर्णधार प्रियांक पांचालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी ऋतुराज गायकवाडचे शतक व यष्टीरक्षक उपेंद्र यादवच्या 76 धावांच्या जोरावर इंडिया ए ने 293 धावा केल्या. न्यूझीलंड ए संघाला आपल्या पहिल्या डावात फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मार्क चॅपमन व सोलिया यांच्या अर्धशतकांमुळे न्यूझीलड ए ने 237 धावा केल्या. इंडिया ए संघातर्फे सौरभ कुमारने 4 तर राहुल चहरने तीन बळी मिळवले. भारतीय संघाला 56 धावांची आघाडी पहिला डावात मिळाली.
इंडिया ए संघाने दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. कर्णधार प्रियांक पांचालने 62, ऋतुराज गायकवाडने 92, सर्फराज खानने 63 व रजत पाटीदारने 109 धावांची शतकी खेळी करत इंडिया ए ला 359 पर्यंत नेत डाव घोषित केला. न्यूझीलंड ए संघाला विजयासाठी 415 भावांचे मोठे लक्ष मिळाले होते. सलामीवीर जो कार्टर याने 111 धावा करतत झुंज देण्याचा प्रयत्न केला. क्लेवर व चॅपमन यांनी अनुक्रमे 44 व 45 धावा करत त्याला साथ दिली. मात्र, सौरभ कुमारने पाच बळी मिळवत त्यांचा डाव 302 धावांवर संपुष्टात आणला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामना धोक्यात! केरळच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमची लाईटच केली कट
काय सांगता, पीसीबीसाठी फुकटची हमाली करतात अध्यक्ष रमीज राजा! म्हटले, ‘घरच्यांची इच्छा नव्हतीच…’
‘नवा बोथम’ म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफविषयी १० रंजक गोष्टी