इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यावर्षीच्या सुरुवातील मानसिक दृष्ट्या पूर्णपणे तुटला होता. त्यावेळी जो रूट इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार होता आणि ब्रॉडला वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळले गेले आहे. पण नंतर ब्रँडन मॅक्युलम संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आणि ब्रॉडला देखील पुनरागमनाची चांगली संधी मिळाली.
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि त्याचा सहकारी जेम्स अँडरसन (James Anderson) या दोन्ही दिग्गाजांना वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडले गेले नव्हते. संघ व्यवस्थपनाचा हा निर्णय सर्वांसाठीच धक्कादायक होता, कारण हे दोघेही संघासाठी चमकदार कामगिरी करत होते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या कसोटी मालिकेत जो रुटच्या नेतृत्वातील इंग्लंड संघ 0-1 पराभूत झाला होता. तसेच त्याआधी खेळलेल्या आशिया चषकात इंग्लंड 0-4 असा मोठा पराभव स्वीकारावा लागला होता.
संघाच्या सततच्या खराब प्रदर्शनामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या कसोटी संघात काही महत्वाचे बदल केले होते. मुख्य प्रशिक्षकपदी ब्रँडन मॅक्युलम आणि कर्णधार म्हणून बेन स्टोक्स याची नियुक्ती केली गेली. जो रुटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. ब्रॉड आणि अँडरसन यांना संघात पुन्हा संधी दिली गेली आणि दोघांनी जोरदार प्रदर्शन देखील केले. कर्णधार बनदल्यानंतर इंग्लंडला सात कसोटी सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळला. या सहा विजयांनंतर गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळाला, असे स्वतः वेगवान गोलंदाज ब्रॉड म्हणाला आहे.
ब्रॉड म्हणाला की, “सात पैकी सहा कसोटी जिंकणे खरच खास होते. याचे श्रेय मॅक्युलम आणि स्टोक्स यांना दिले गेले पाहिजे. त्यांनी एक वेगळी शैली विकसित केली आहे. मी या संघाचा भाग आहे, जिथे प्रत्येक खेळाडू म्हणू शकतो की, मी कसोटी विजयात काहीतरी योगदान दिले आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यात संधी मिळाली नाही, तेव्हा मी पूर्णपणे तुडलो होतो. पण त्या गोष्टींमुळे मला स्वतःचा खेळ सुधारण्यात मदत मिळाली. मी यासाठी ब्रॉड आणि स्टोक्सला धन्यवाद म्हणू इच्छितो की, त्यांनी संघाला एक वेगळी ओळख दिली.”
कसोटी क्रिकेटमधील दुसरा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज –
दरम्यान ब्रॉड कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅकग्रा यांना मागे टाकले आणि यादीत दुसरा क्रमांक पटकावला. पहिल्या क्रमांकावर इंग्लंडचाच दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘आशिया चषकाचे सोडा विराटने शतक केले’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केले किंग कोहलीचे कौतुक
भारतीय खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र थांबेना! आता ‘हा’ वेगवान गोलंदाज महत्वाच्या मालिकेपूर्वी संघातून बाहेर
काय सांगता, पीसीबीसाठी फुकटची हमाली करतात अध्यक्ष रमीज राजा! म्हटले, ‘घरच्यांची इच्छा नव्हतीच…’