मंगळवारी (९ नोव्हेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारत अ संघाला तीन चार दिवसीय कसोटी सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी प्रियांक पंचालकडे कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे.
२३ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून तिन्ही चार दिवसीय कसोटी सामने ब्लोएमफॉन्टेन येथे होणार आहे. पहिला सामना २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. तसेच २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान दुसरा आणि ६ ते ९ डिसेंबरदरम्यान तिसरा सामना होणार आहे.
या दौऱ्यासाठी भारताच्या अ संघात पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडीक्कल, सर्फराज खान अशा फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक फळंदाज उपेंद्र यादवला देखील संधी देण्यात आली आहे. राहुल चाहर, नवदीप सैनी, उम्रान मलिक, इशान पोरेल, अर्झन नागवासवाला अशा गोलंदाजांनाही संधी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघ –
प्रियांक पांचाल (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, देवदत्त पडीक्कल, सर्फराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), के गॉथम, राहुल चाहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी , उम्रान मलिक, इशान पोरेल, अरझान नागवासवाला
महत्त्वाच्या बातम्या –
अजिंक्य रहाणेची बॅट तळपली! मुंबईचे नेतृत्व करताना अवघ्या ५ सामन्यांत ठोकली ४ अर्धशतकं
भारीच! अय्यर आधी आयपीएलमध्ये चमकला आता एकाच सामन्यात २२ डॉटसह घेतल्या २ विकेट्स अन् ठोकल्या ३६ धावा