सौराष्ट्र संघाचे माजी कर्णधार सितांशु कोटक यांना बांगलादेश दौऱ्यासाठी भारत अ संघांच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. या दौऱ्यावर चार एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी खेळवण्यात येईल. राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये फलंदाजी प्रशिक्षकांपैकी एक असलेले कोटक या दौऱ्यावर ट्राय कूली आणि टी दिलीप यांची मदत करतील. दिलीप हे राष्ट्रीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. त्यांना टी20 विश्वचषकानंतर काही काळासाठी आराम देण्यात आला होता.
टी दिलीप (T. Dilip) हे भारत अ संघासोबत दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यानंतर बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघासोबत असतील. भारतीय संघाचा पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे 14 ते 18 डिसेंबर आणि ढाका येथे 22 ते 26 डिसेंबर यादरम्यान दोन कसोटी सामने खेळणार आहे. एनसीए अध्यक्ष वीवीएस लक्षण (VVS Laxman) आणि त्यांचा सहकारी स्टाफचे सदस्य ऋषिकेश कानिटकर आणि साईराज बहुतुले सध्या भारतीय संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे कोचिंग स्टाफमध्ये बदल करावा लागला.
बांगलादेश विरुद्ध पहिल्या दोन सामान्यांसाठी भारत अ संघ
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुन्नुमल, यशस्वी जयस्वाल, यश ढुल, सरफराझ खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), सौरभ कुमार, राहुल चाहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि अतित सेठ,
बांगलादेेश विरुद्ध नंतरच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघ
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुन्नुमल, यशस्वी जयस्वाल, यश ढुल, सरफराझ खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), सौरभ कुमार, राहुल चाहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि अतित सेठ, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव आणि केएस भरत (यष्टीरक्षक)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन्सीवरुन रोहितचा पत्ता होणार कट? बीसीसीआयने बोलावली इमर्जन्सी बैठक
बायकोमुळे युझवेंद्र चहलवर वाईट वेळ! शिखर धवनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ






