भारतीय संघ सध्या न्यूजीलंड दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना रविवारी (27 नोव्हेंबर) खेळला गेला पण, पावसामुळे सामना निकाली होऊ शकला नाही. आता संघाला मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवार, 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी शिखर धवनने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत धवन युझवेंद्र चहल याची फिरकी घेतना दिसत आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्रांतीवर आहे. रोहितच्या अनुपस्थितीत टी-20 संघाचे कर्णधारपत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने सांभाळले. तर एकदिवसीय संघाचे नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) करत आहे. धनवच्या नेतृत्वातील संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सच्या अंतराने गमावला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अवघ्या 12.5 षटकांचा खेळ होऊ शकला होता. न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना खेळण्यासाठी संघाला क्राईस्टचर्चमध्ये दाखल व्हायचे होते. यादरम्यान, कर्णधार शिखर धवनने फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओद दिसत आहे की, युझवेंद्र चहल खांद्यावर मागे आणि पुढे अशा दोन बॅग, तसेत हातातही दोन बॅघ घेऊन चालला आहे. धवन व्हिडिओच्या सुरुवातील चहलला चिडवताना दिसतो. धवन म्हणतो, “युझीची खरी अवस्था उघड झाली आणि सर्वांना समजले आहे की, युझी कशामुळे हमाल बनला आहे.” तितक्यात चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Varma) मागून येते आणि तिच्या हातात मात्र फक्त एकच बॅग असते.
शिखर धवन धनश्रीला म्हणतो की, “यावर तुम्ही काय म्हणाल?” धनश्रीने उत्तर दिले की, “माझा पाय खूप दुखत आहे, नाहीतर सर्व जगाचे ओझे मीच उचलंत असते.” यावर धवन पुढे बोलताना म्हणतो की, “हो पण मग आमच्या या छोट्या जीवाचं (चहल) काय होणार?” यावर धनश्री मजेशीर उत्तर देत म्हणते, “ओझं उचललं तर काय झालं, उचलूद्या थोडं ओझं. थोडा मजबूत बनूद्या.” व्हिडिओच्या शेवटी धनश्री आणि धवन दोघेही मोठ्याने हसताना दिसत आहेत, तर चहल मात्र गुपचूप मान खाली घालून तिथून निघून गेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चाहते चहलची चांगलीच फिरकी घेत आहेत.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांचायातील दुसरा सामना हेमिल्टनमध्ये आयोजित केला गेला होता. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. 12.5 षटकांमध्ये भारताने एक विकेटच्या नुकसानावर 89 धावा केल्या होत्या. पण पुढचा खेळ मात्र होऊ शकला नाही. न्यूजीलंड सध्या 1-0 अशा आघाडीवर आहे. तिसरा आणि शेवटचा सामना भारताने जिंकला, तर मालिका बरोबरीने सुटू शकते. (Bad time for Yuzvendra Chahal because of his wife! Shikhar Dhawan shared a funny video.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेट लीचा अर्शदीप सल्ला, ‘जर चांगला गोलंदाज व्हायचं असेल तर आधी हे बंद कर’
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, जस क्रिकेट अकादमी संघांचा मोठा विजय