---Advertisement---

South Africa A vs India A: पहिल्या कसोटी पावसामुळे अनिर्णित; इश्वरनचे शानदार शतक, तर ९६ धावा

Abhimanyu Easwaran
---Advertisement---

भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील ब्लूमफॉन्टेन येथे झालेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली आणि चौथ्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. यजमानांनी घोषित केलेल्या ७ बाद ५०९ धावांच्या प्रत्युत्तरात भारत अ संघाची तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद ३०८ अशी अवस्था झाली. अभिमन्यू ईश्वरनने शानदार शतक झळकावले, तर कर्णधार प्रियांक पांचालचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले.

दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने ५०९ धावांवर डाव घोषित केला. कर्णधार पीटर मलानने १६३ आणि टोनी डी जॉर्जीने ११७ धावा केल्या. यष्टिरक्षक क्वेशिलेने ८२ धावांचे योगदान दिले. जेसन स्मिथने ५२ आणि जॉर्ज लिंडेने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. ईश्वरनने २०९ चेंडूत १०३ धावांची खेळी केली, तर प्रियांक पांचाळने १७१ चेंडूत ९६ धावांची खेळी केली.

पृथ्वी शॉने ४५ चेंडूत ४८ धावा केल्या, त्याने आपल्या खेळीत ९ चौकार मारले. पण त्याला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. सिपामलाच्या चेंडूवर शॉ यष्टिरक्षक क्वेशेलकरवी झेलबाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी वगळण्यात आलेल्या हनुमा विहारीने ५३ चेंडूत २५ धावा केल्या. बाबा अपरजित १९ आणि उपेंद्र यादव ५ धावा करून नाबाद राहिले.

या मैदानावर २९ नोव्हेंबरपासून भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या दौऱ्यात जो कोणी चांगली कामगिरी करेल, त्यातील काही खेळाडूंना वरिष्ठ संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येईपर्यंत थांबवले जाऊ शकते. पुढील महिन्यात भारताचा वरिष्ठ संघ कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

न्यूझीलंडसोबतची दुसरी कसोटी संपल्यानंतर भारतीय संघाचे काही वरिष्ठ खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. आता दक्षिण आफ्रिकेत कोविडच्या नवीन प्रकारामुळे आगामी काळात क्रिकेटवर संकटाचे ढग दाटू लागले आहेत. नेदरलँड्सनेही तीन पैकी पुढील दोन वनडे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताच्या दौऱ्यावर काही परिणाम होणार का, हे पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“टीम पेन संघात हवा कारण, तो जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे”

श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीने संघ व्यवस्थापन गोत्यात, मुंबई कसोटीत रहाणेवर टांगती तलवार

…म्हणून सुरेश रैना आहे जगातील सर्वात दिलदार व निस्वार्थी क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---