---Advertisement---

आयपीएल २०२१ पूर्वी भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंसाठी ‘ही’ आहे खुशखबर

---Advertisement---

येत्या एप्रिल महिन्यात आयपीएल २०२१ हंगामाचा थरार रंगणार आहे. येत्या ९ एप्रिल पासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी तयारीला देखील सुरुवात केली आहे. या हंगामा सहभागी होणारे काही खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यामध्ये व्यस्त आहेत तर काही खेळाडू आपल्या संघाला जोडले गेले आहेत. नुकत्याच बीसीसीआयने आयपीएल २०२१ हंगामासाठी एक नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडूंना विशेष सूट देण्यात आली आहे.

आयपीएल २०२० स्पर्धा कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे युएईमध्ये खेळवण्यात आली होती. त्यानंतर आता या स्पर्धेचे भारतात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने लागु केलेल्या नवीन नियमावलीत भारत आणि इंग्लंड यांच्याच सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळत असलेल्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेसाठी पृथकावासात राहायची गरज भासणार नाही. हे खेळाडू थेट आपल्या आयपीएल फ्रांचाईजींना जोडले जाऊ शकतील.

याचे कारण असे की, हे खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून बायो बबलमध्येच आहेत. त्यामुळे त्यातून ते थेट आपल्या आयपीएल संघांच्या बायोबबलमध्ये सहभागी होती. परंतु या खेळाडूंना संघाच्या हॉटेलपर्यंत बस किंवा चार्टर्ड प्लेनने यावे लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना होणार फायदा

बीसीसीआयने लागु केलेल्या नवीन नियमात असेही म्हटले आहे की, जे खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघासोबत आधी पासूनच बायो बबलमध्ये आहेत. ते सरळ आपल्या आयपीएल संघांना जोडले जाऊ शकतील. दक्षिण आफ्रिकन संघ पाकिस्तान संघाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. यामुळे २ एप्रिलपर्यंत क्विंटन डीकॉक, कगीसो रबाडा, डेव्हिड मिलर, एन्रीच नॉर्किए आणि लुंगी एन्गिडी हे खेळाडू बायो बबलमध्येच असणार आहेत. त्यानंतर हे खेळाडू आपल्या आयपीएल संघाला जोडले जातील. परंतु त्यांना चार्टर्ड प्लेनने प्रवास करावा लागेल.

१२ बायो बबल तयार केले जाणार

आयपीएल २०२१ च्या हंगामासाठी बीसीसीआयने १२ बायो बबल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यात ८ बायो बबल, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ करिता असणार आहे. तर २ बायो बबल हे ब्रॉडकास्ट कमेंटेटर आणि क्रूसाठी असणार आहेत. तर २ बायो बबल हे सामनाधिकारी आणि संघ व्यवस्थापकांसाठी असणार आहे. तसेच बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, ज्या संघ मालकांना बायो बबलमध्ये प्रवेश करायचा असेल त्यापूर्वी त्यांना ७ दिवस पृथकवासात राहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

INDvENG : निर्णायक ५ व्या टी२० सामन्यात रोहित, केएल राहुलसह ‘हे’ क्रिकेटपटू करु शकतात मोठे विक्रम

बाबो! भारतीय अष्टपैलू जडेजाच्या गाडीपुढे अचानक आला वाघ अन्… पाहा थरारक व्हिडिओ

सीएसकेच्या कॅम्पमध्ये ‘वाथी कमिंग’ची हवा, ऋतुराजसह ‘यांनी’ धरला ताल; पाहा झक्कास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---