चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवून एका दगडात दोन पक्षी मारले. यजमान संघाने पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाकिस्तान क्रिकेट संघाची एका विक्रमात बरोबरी केली आहे. आता रोहित शर्मा आणि कंपनी दुसरी कसोटी जिंकून पाकिस्तानला मागे टाकण्याचा प्रयत्न करेल.
बांगलादेश संघाने आतापर्यंत एकाही कसोटी सामन्यात भारताचा पराभव केलेला नाही. दोन्ही संघांमध्ये 14 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघाने 12 सामने जिंकले असून 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये 15 कसोटी खेळल्या गेल्या आहेत. यापैकी पाकिस्तानने 12 सामने जिंकले. बांगलादेशने 2 सामने जिंकले असून, 1 सामना अनिर्णित राहिला आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय संघाने बांगलादेशला कसोटीत पराभूत करण्याच्या बाबतीत पाकिस्तानची बरोबरी केली आहे.
नुकतीच बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. बांगलादेशने ही मालिका 2-0 ने जिंकली. पाकिस्तान हा विजयाचा प्रबळ दावेदार नक्कीच मानला जात होता. मात्र, या संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे. ही कसोटी 27 सप्टेंबरपासून सुरू होईल. हा सामना जिंकून कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. दुसरीकडे, मोठ्या उत्साहाने आलेल्या बांगलादेश संघाला दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
चेन्नई येथे झालेल्या या पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार लोकल बॉय रविचंद्रन अश्विन ठरला. त्याने जबरदस्त कामगिरी करताना पहिल्या डावात शतक झळकावले. त्यानंतर चौथ्या दिवशी बांगलादेशच्या दुसऱ्या डावातील सहा गडी बाद करून सामनावीर पुरस्कार मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs ENG: चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी पाकिस्तानला जोरदार झटका, कोटींचे नुकसान
बांगलादेश ऐवजी यूएईमध्ये का खेळला जातोय महिला टी20 विश्वचषक? जाणून घ्या भारत-पाकिस्तान सामना कधी होणार
मयंक अग्रवालच्या संघानं जिंकली दुलीप ट्रॉफी, फायनलमध्ये ऋतुराजच्या टीमचा पराभव