Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जय शाहांची मोठी माहिती! आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान…

जय शाहांची मोठी माहिती! आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान...

January 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
IND-vs-Pak-Win-Moment

Photo Courtesy: Twitter/BCCI


आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी 2023 आणि 2024 चे वेळापत्रक जाहीर केले. यादीत चाहत्यांचे सर्वात आधी लक्ष वेधले ते यावर्षी खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक 2023 च्या आजोयनाने. आगामी आशिया चषक वनडे फॉरमॅटमध्ये खेळला जाणार असून भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकाच ग्रुपमध्ये खेळणार आहेत.

अमित शाह (Jay Shah) यांनी ट्वीटरवर पुढच्या दोन वर्षांचे नियोजन चाहत्यांसोबत शेअर केले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षांनी शेअर केलेल्या या ट्वीटमधून चाहत्यांना त्यांचा संघ पुढच्या दोन वर्षात कधी कोणती स्पर्धा खेळणार, हे समजले. यावर्षी सप्टेंबर महिन्यात आशिया चषक आयोजित केला गेला असून पहिल्या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघाला सामील केले गेले आहे. या ग्रुपमधील तिसरा संघ अद्याप निश्चित नाहीये. ग्रुप दोनमध्ये गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आहेत. अशात चाहत्यांना आगामी आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान हा थरार पुन्हा एकदा पाहायला मिळणार यात शंका नाही.

Presenting the @ACCMedia1 pathway structure & cricket calendars for 2023 & 2024! This signals our unparalleled efforts & passion to take this game to new heights. With cricketers across countries gearing up for spectacular performances, it promises to be a good time for cricket! pic.twitter.com/atzBO4XjIn

— Jay Shah (@JayShah) January 5, 2023

आशिया चषकाचे आयोजिन पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे मागच्या काही महिन्यांमध्ये सांगितले जात आहे. मात्र बीसीसीआय मात्र या निर्णयाशी सहमत नसल्याचे दिसत नाहीये. यावर्षीच्या आशिया चषकाचे जयमानपण अधिकृतपणे पाकिस्तानकडे असले, तरी बीसीसीआयने या निर्णयाला विरोध केला आहे. भारत आणि पाकिस्तान संघ मागच्या काही वर्षापासून द्विपक्षीय मालिका खेळले नाहीत. भारतीय संघाने 2008 नंतर पाकिस्तानचा एकही दौरा देखील केला नाहीये. अशात आशिया चषकासाठी देखील संघाने पाकिस्तानला जाण्यास विरोध केला आहे.

एसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिन जय शहा यांनी संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे स्पष्टच बोलून दाखवले होते. बीसीसीआय सचिवांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान संघ आणि त्यांच्या बोर्डासाठी हा मोठा धक्का बसला होता. पीसीबीचे माजी अध्यक्ष समीच राजा यांनी देखील जय शहांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध केला होता. अशात आगामी आशिया चषक कुठे आयोजित केला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (India and Pakistan will play in the same group in Asia Cup 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी क्रमवारीत हार्दिकसोबत भारताच्या ‘या’ चार खेळाडूंना फायदा, स्मिथने बाबरला टाकले मागे
VIDEO: 19 वर्षांपूर्वी सचिनने खेळलेली मॅरेथॉन इनिंग; मात्र द्विशतकादरम्यान मारला नव्हता एकही कव्हर ड्राईव्ह 


Next Post
Cricket Ground

आजच्याच दिवशी 15 वर्षीय मुंबईकराने घातलेला धावांचा रतीब, एकाच डावा चोपलेल्या नाबाद 1009 धावा

File Photo

पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात हिंदू जिमखाना, डीव्हीसीए संघांचे वर्चस्व

Photo Courtesy: Twitter/ICC/Youtube

शाकिबला व्हायचेच 'नायक'चा अनिल कपूर! म्हणला, "एका दिवसात सगळं बदलेल"

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143