रविवारी (06 जानेवारी) गुवाहाटी येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडणार होता. मात्र या खेळपट्टीत ओलावा असल्याने सामना रद्द करण्यात आला.
असे असले तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी रविवारचा दिवस एका चाहत्याने खास बनविला. झाले असे की या सामन्यापूर्वी विराटला त्याच्या एका चाहत्याने एक चित्र भेट म्हणून दिले आहे.
या चित्राचे विशेष म्हणजे हे चित्र जुन्या मोबाईल फोनच्या मदतीने बनविण्यात आला आहे.
राहुल पारेख या चाहत्याने मोबाईल फोन आणि तारेचा वापर करत हे चित्र बनविले आहे. हे चित्र तयार करण्यासाठी त्याला 3 दिवसांचा कालावधी लागला होता. विराटने जेव्हा हे चित्र पाहिले तेव्हा तो आपल्या या चाहत्यावर प्रभावित झालेला पाहायला मिळाला. तसेच त्याने या चित्रावर स्वाक्षरीही केली आहे.
विराटचा आणि त्याच्या चाहत्याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
Making art out of old phones.
How is this for fan love! 👏👏 #TeamIndia @imVkohli pic.twitter.com/wnOAg3nYGD— BCCI (@BCCI) January 5, 2020
हा व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयने लिहिले की, “जुन्या मोबाईल फोनच्या सहाय्याने कलाकृती बनवणे. हे एक चाहत्याचे प्रेम आहे.”
जो विक्रम सचिनने भारतासाठी केला तोच विक्रम टेलरने न्यूझीलंडसाठी केला!
वाचा👉https://t.co/2tGbxUFMhj👈#म #मराठी #Cricket #AUSvNZ @RossLTaylor— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
सामना झाला नाही पण भारतीय जुगाडाची झाली सगळीकडेच चर्चा
वाचा👉https://t.co/nlqu4bDWqG👈@BCCI #म #मराठी #Cricket #INDvSL— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020