---Advertisement---

२०२० वर्षासाठी कुलदीप यादवचा आहे हा खास प्लॅन

On: शुक्रवार, जानेवारी 10, 2020 10:30 AM
---Advertisement---

आज (10 जानेवारी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA), पुणे येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेमधील अंतिम सामना (Last Match of T20I Series) पार पडणार आहे. या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यापूर्वी भारताचा फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्यातील कमतरता आणि चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत.

“2019 हे वर्ष खूपच कठीण होते. मी अनेक गोष्टी शिकलो. तसेच त्यापैकी एक सकारात्मक गोष्ट ही आहे की मी चांगल्या पद्धतीने रणनीती बनवू शकत होतो,” असे तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना कुलदीप म्हणाला.

“जर मी जास्त विचार केला असता आणि मी स्वत:ला जास्त वेळ दिला असता तर मला चांगली कामगिरी करता आली असती. 2020 मधील प्रत्येक सामन्यात चांगल्या रणनीती बनवण्याची आणि स्वत:ला वेळ देण्याचा प्रयत्न करेल,” असे कुलदीप यावेळी म्हणाला.

“आता सर्वांनाच माहिती आहे की मी कशाप्रकारे गोलंदाजी करतो. मी चायनामन गोलंदाज आहे. मला माझ्या गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल. जेणेकरून फलंदाजाला माझी गोलंदाजी ओळखता आली नाही पाहिजे,” असेही आपल्या रणनीतिबद्दल बोलताना कुलदीप यावेळी म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---