---Advertisement---

चहलचा या गोलंदाजाला प्रश्न, बुमराह यॉर्कर किंग आहे, तर तू यॉर्कर क्वीन आहेस?

On: शुक्रवार, जानेवारी 10, 2020 12:47 PM
---Advertisement---

मंगळवारी (7 जानेवारी) इंदोर येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. सैनीने 4 षटकात 18 धावा देऊन 2 खेळाडू बाद केले. तर ठाकूरने 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

या सामन्यानंतर युजवेंद्र चहलने सैनी आणि ठाकूरची मुलाखत घेतली. चहल या सामन्यात भारताच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये सामील नव्हता. या सामन्यानंतर मुलाखत घेताना चहल सैनीला मस्करी करत म्हणाला, ‘आता जसप्रीत बुमराह यॉर्कर किंग आहे, तर तू यॉर्कर क्वीन आहेस?’

बीसीसीआयने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये चहलने ठाकूरला विचारले की,  ‘तू 19 व्या षटकात तीन विकेट घेतले , त्यावेळी तुझ्या मनात काय चालले होते?’ त्याला प्रत्युत्तर देताना ठाकूर म्हणाला, ‘कुलदीप आणि सैनी दोघेही विकेट घेत होते. तर मी विचार केला मी असे का करू शकत नाही. ठाकुर म्हणाला, प्रयत्न तर हॅट्रीक घेण्याचा होता. पण तरीही तीन विकेट घेणे मोठे समाधानकारक आहे.’

तसेच ठाकूर सैनीच्या यॉर्कर बॉलबद्दल बोलताना म्हणाला, जेव्हा जेव्हा तो पंजाबीमध्ये बोलतो तेव्हा तो यॉर्कर टाकतो. महत्त्वाचे म्हणजे, श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणातिलकाला त्याने 147.5 किमी प्रतितास वेगाने फेकलेल्या यॉर्करवर बोल्ड केले.

त्याचबरोबर पुढे चहलच्या यॉर्कर क्वीनच्या प्रश्नावर सैनी म्हणाला, खेळपट्टी सपाट होती आणि अशा परिस्थितीत त्याला स्वत: ला सिद्ध करण्याची संधी मिळाली. तो म्हणाला की मला सतत सराव करायचा आहे.

भारताने हा सामना 7 विकेट्सने  जिंकला. आता तीसरा आणि अंतिम सामना 10 जानेवारीला पुण्यामध्ये खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---