---Advertisement---

केवळ ९ धावा करताच रोहित शर्मा मोडणार २२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी कटकमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून मालिकेत बरोबरीत आहेत.  

सलामीवीर म्हणून रोहित शर्माने यावर्षी आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व प्रकारात 10 शतके केली आहेत. आता रविवारी त्याच्याकडे आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे.

रविवारी रोहितने आणखी 9 धावा केल्या तर तो श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याचा 22 वर्षांचा विक्रम मोडेल आणि सलामीवीर म्हणून एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनू शकेल.

रोहितने 2019 मध्ये आतापर्यंत सलामीला खेळताना 47 सामन्यात 52.86च्या सरासरीने 10 शतके आणि 9 अर्धशतकांसह 2379 धावा केल्या आहेत. तसेच जयसूर्याने 1997 मध्ये 37 सामन्यात 58.21 च्या सरासरीने 6 शतके आणि 15 अर्धशतकांसह 2387 धावा केल्या होत्या.

त्यामुळे जयसूर्याला मागे टाकण्यासाठी रोहितला केवळ 9 धावाची आवश्यकता आहे.

तसेत रोहित हा एका वर्षात सलामीवीर म्हणून 10 शतके करणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर – 

2387 – सनथ जयसुर्या (1997)

2379 – रोहित शर्मा (2019)

2355 – विरेंद्र सेहवाग (2008)

2349 – मॅथ्यू हेडन (2003)

2296 – सईद अन्वर (1996)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---