---Advertisement---

BREAKING: भारतच आशियाचा सरताज! मलेशियाचा पराभव करत जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

---Advertisement---

चेन्नई येथे झालेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. मलेशियाविरुद्ध अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत 4-3 असा विजय मिळवला. या स्पर्धेत भारतीय संघाचे हे चौथे विजेतेपद ठरले.

या सामन्यात भारतीय संघाने सुरूवातीला गोल करत आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर मलेशियाने आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सातत्याने भारतीय गोलक्षेत्रात धडक मारत तीन गोल झळकावले. मध्यांतरावेळी मलेशियाने 3-1 अशी भक्कम आघाडी घेतली.

भारतीय संघाने तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या 2 मिनिटात 2 गोल करून सामन्यात 3-3 ने बरोबरी साधली.
कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोक वर गोल केला. तर गुर्जंतने मैदानी गोल करत मलेशियाशी बरोबरी साधून दिली. दोन मिनिटे शिल्लक असताना आकाशदीप सिंगने गोल करून भारताला 4-3 ने आघाडीवर नेले आहे. ही आघाडी टिकवत भारताने विजय साजरा केला.

(INDIA ARE THE ASIAN CHAMPIONS TROPHY 2023 WINNER)

महत्वाच्या बातम्या –
WIvsIND । आपल्या खेळाडूंवर हार्दिकला विश्वास! चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावली, पण प्लेइंग इलेव्हन तीच
‘तो कंफ्यूज दिसत होता…’, हार्दिकच्या नेतृत्वाबाबत भारतीय खेळाडूची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---