संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामनाही जिंकला. उभय संघातील या टी-२० मालिकेत दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारताने आयर्लंडला क्लीन स्वीप दिला आहे. सॅमसन आणि हुड्डाने या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद केली, पण यादरम्यान भारतीय संघाच्या नावापुढे एका नकोशा विक्रमाची देखील नोंद झाली आहे.
संजू सॅमसन (Sanju Samson) मोठ्या काळानंतर भारतीय संघासाठी खेळला आणि त्याने मिळालेल्या या संधीचे सोने केले. सॅमसनने ४२ चेंडूत ७७ धावा केल्या आणि दीपक हुड्डाच्या मदतीने संघाला एक चांगली सुरुवात करून दिली. सॅमसनने या सामन्यात ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने या धावा केल्या. दुसरीकडे दीपक हुड्डा (Deepak Hooda) स्वतःचे टी-२० आंतरराष्ट्रीयमधील पहिले शतक साकारू शकला. त्याने अवघ्या ५५ चेंडूत शतक ठोकले. एकूण ५७ चेंडू खेळून हुड्डाने १०४ धावा केल्या.
सलामीवीर इशान किशन स्वस्तात बाद झाल्यानंतर सॅमसन आणि हुड्डा यांनी भारताचा डाव सांभाळला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी झाली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी केली गेलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने या सामन्यात टी-२० आंतरराष्ट्रीयच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभी केली.
टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारतीय संघाने केलेल्या सर्वात मोठ्या धावसंख्या
२६०/५ विरुद्ध श्रीलंका, २०१७
२४४/४ विरुद्ध वेस्ट इंडीज, २०१६
२४०/३ विरुद्ध वेस्ट इंडीज, २०१९
२२५/३ विरुद्ध आयर्लंड, २०२२
या सामन्यात सॅमसन आणि हुड्डाने कमाल केली, पण दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल यांनी एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या. या तिघांपैकी एकालाही स्वतःचे खाते खोलता आले नाही. आयर्लंडच्या गोलंदाजांनी या तिघांनाही गोल्डन डकवर बाद केले. आंतरराष्ट्रीय टी-२० च्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे, जेव्हा एखाद्या संघातील तीन खेळाडू गोल्डन डकवर बाद झाले असतील आणि त्यांनी २०० पेक्षा मोठी धावसंख्या उभी केली असेल. अशा कामगिरी करणारा भारत पहिला संघ बनला आहे.
आयर्लंडमध्ये सर्वात मोठी धावसंख्या करणारा भारत दुसरा संघ
२५२/३ विरुद्ध स्कॉटलंड, २०१९
२२५/७ विरुद्ध भारत, २०२२
२१३/४ विरुद्ध भारत, २०१८
२०८/५ विरुद्ध भारत, २०१८
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बाबर चा कहर! आता तर थेट विराटचाच विक्रम केलाय स्वत:च्या नावावर
रोहित-राहुल नाही तर ‘ही’ जोडी भारतासाठी ठरलेय सुपरहिट! रचली सर्वात मोठी भागिदारी
हार्दिक पंड्याने चालवला कॅप्टन कूलचा वारसा, मालिका विजयानंतर केलेल्या कृत्याचं होतय तोंडभरून कौतुक