---Advertisement---

भारत-ऑस्ट्रेलिया नव्हेतर ‘या’ संघाला WTC फायनलमध्ये जाण्याची सर्वात सोपी संधी, केवळ दोन सामने…

On: रविवार, फेब्रुवारी 12, 2023 4:32 PM
---Advertisement---

भारतीय संघाने नागपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याची नवी समीकरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार आता भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे तीन संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम असल्याचे दिसून येते. 

 

नागपूर येथे झालेला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने एकतर्फी आपल्या नावे करत अंतिम फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले. भारतीय संघाला या विजयाचा मोठा फायदा झाला. केवळ तीन दिवसात मिळवलेल्या या विजयानंतर भारताच्या खात्यात 12 गुणांची भर पडून गुणांची संख्या 111 अशी पोहोचली. तर, गुणांच्या टक्केवारीतही मोठी वाढ होऊन ही टक्केवारी आता 58.93 वरून 61.67 अशी वाढलेली आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी 62.50 टक्के इतकी गुणांची टक्केवारी आवश्यक आहे. भारतीय संघाने या मालिकेत आणखी दोन विजय मिळवल्यास संघ ही टक्केवारी पार करत थेट जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. भारताने पुढील तीनही सामने जिंकल्यास ही टक्केवारी 68.60 अशी सर्वोत्तम राहील.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. ते सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असून, त्यांची टक्केवारी 70.83 अशी‌ आहे. ऑस्ट्रेलियाने पुढील तीनही कसोटी गमावल्यास त्यांनी गुणांची टक्केवारी 59.64 इतकी खाली येईल. त्याचवेळी एक विजय मिळवला तरी त्यांची टक्केवारी 64.91 अशी राहून ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. ते एक सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी झाले तर, 61.40 इतकी गुणांची टक्केवारी त्यांच्या खात्यात जमा होईल.

या सर्वात श्रीलंका संघासाठीही अद्याप संधी दिसून येते. ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध एकही विजय न मिळवू शकल्यास, तसेच सामना अनिर्णित न राखू शकल्यास श्रीलंकेला केवळ न्यूझीलंडला दोन्ही सामन्यात पराभूत करावे लागेल. या दोन विजयांसह ते ते सहज अंतिम फेरीत प्रवेश करतील. उभय संघांमधील ही मालिका मार्च महिन्यात खेळली जाईल.

(India Australia And Srilanka In WTC Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारणार का? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---