---Advertisement---

ऐतिहासिक! भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकले मानाच्या स्पर्धेत पदक

On: सोमवार, फेब्रुवारी 20, 2023 9:39 PM
---Advertisement---

सोमवारी (20 जानेवारी) बॅडमिंटन आशिया मिश्र संघ चॅम्पियनशिप स्पर्धा समाप्त झाली. दोहा येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई केली. भारतीय संघाचे या स्पर्धेतील हे पहिलेच पदक ठरले. चीनने दक्षिण कोरियाला पराभूत करत स्पर्धेचे सुवर्णपदक आपल्या नावे केले.

दोहा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाचा ब गटात समावेश होता. अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन तसेच महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व दुहेरीचा स्पेशलिस्ट खेळाडू चिराग शेट्टी यांच्यासह अनेक युवा खेळाडूंचा भारतीय संघ सहभागी झालेला. ब गटात भारतीय संघाने युएई, मलेशिया व कझाकस्तान यांना पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलेली. उपांत्यपूर्व फेरीत भारताने हॉंगकॉंगचा पाडाव केला. मात्र, उपांत्य फेरीत भारतीय संघाला चीनकडून 3-2 असा नजीकचा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला थायलंडसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या विजयासह भारताने आगामी सुदीरमन कपमध्येही भारताचे स्थान पक्के झाले.

भारतीय संघाच्या या यशानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी संघाचे कौतुक करणारे ट्विट केले. त्यांनी लिहिले,

‌’भारतीय संघाचे या मानाच्या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. संघाची ही कामगिरी अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. या स्पर्धेतील भारताचे पहिलेच पदक. तसेच, आगामी सुदीरमन कपमध्ये संघाने जागा मिळवल्याबद्दलही अभिनंदन.’

सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत चीनने शानदार खेळ दाखवत दक्षिण कोरिया ला मात करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक आपल्या नावे केले.

(India Badminton Team Won First Ever Medal In Asia Mix Team Championship In Doha)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्डब्रेकर हॅरी! कोणताही भारतीय पुरूष क्रिकेटपटू न करू शकलेली कामगिरी हरमनच्या नावे 
केवळ ‘त्या’ दोन खेळ्यांमुळे फ्लॉप असूनही राहुलला मिळतेय संधी, रोहितच करतोय पाठराखण 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---