Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केवळ ‘त्या’ दोन खेळ्यांमुळे फ्लॉप असूनही राहुलला मिळतेय संधी, रोहितच करतोय पाठराखण

February 20, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दोन विजय आपल्या नावे केले असले तरी, उपकर्णधार केएल राहुल याचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. राहुलने दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत मिळून फक्त 18 धावा केल्या. तसेच, नागपूर कसोटीतही तो संघर्ष करताना दिसला होता. यानंतर त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी होत आहे. मात्र, भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दोन खेळ्यांमुळे त्याला आणखी संधी देताना दिसतोय.

सन 2022च्या सुरुवातीपासून केएल राहुल याने 11 कसोटी डावात फक्त 175 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ही 15.90 इतकी राहिली आहे. त्याने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत नेतृत्व केले होते. त्याने एकूण 47 सामने खेळूनही त्याची कसोटी सरासरी ही फक्त 33.44 इतकीच आहे. याच आकड्यांचा दाखला देत त्याला संघातून बाहेर करावे असे अनेक जण म्हणताना दिसतात. परंतु, कर्णधार रोहित शर्माने त्याच्या दोन खेळ्यांचा उल्लेख करत त्याला आणखी संधी देण्याचे म्हटले.

दिल्ली कसोटीनंतर रोहित म्हणाला,

“केवळ राहुलच नव्हे तर कोणत्याही खेळाडूची अशीच कहाणी असू शकते. त्याने विदेशात आमच्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. लॉर्ड्स कसोटीतील तसेच सेंचुरियन कसोटीतील त्याचे शतक शानदार होते.”

राहुलने 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्स कसोटीत प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर दमदार शतक ठोकले होते. हा सामना भारतीय संघाने आपल्या नावे केलेला. त्यानंतर 2021 च्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील सेंच्युरियन कसोटीत त्याच्या बॅटमधून शतक आले होते. मात्र, याव्यतिरिक्त तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

(Captain Rohit Sharma Backs KL Rahul Because Of His Centuries At Lords And Centurion)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत थॉर, ब्लॅक पँथर्स संघांची विजयी सलामी
दिल्ली कसोटी गमावताच पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडला भारत! वाचा संपूर्ण प्रकरण


Next Post
Photo Courtesy: Twitter

विराट-रोहितनंतर हरमनच! टी20 कारकिर्दीत पार केला नवा मैलाचा दगड

Photo Courtesy: Twitter/Anurag Thakur

ऐतिहासिक! भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकले मानाच्या स्पर्धेत पदक

Indian Womens Team

शाब्बास पोरींनो! आयर्लंडला धूळ चारत सलग दुसऱ्यांदा टीम इंडिया टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143