---Advertisement---

‘याला हनिमूनला पाठवा’, सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या राहुलवर भडकले चाहते

On: शनिवार, फेब्रुवारी 18, 2023 7:53 PM
KL-Rahul
---Advertisement---

दिल्ली येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीतील दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर आपली पकड बनवण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 62 धावांची आघाडी मिळवली.‌ त्याचवेळी भारतीय सलामीवीर व उपकर्णधार केएल राहुल याची खराब कामगिरी सुरूच राहील. पहिल्या डावात तो अपयशी ठरल्यानंतर आता नेटकरी त्याच्यावर चांगले संतापले आहेत.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुल अवघ्या 17 धावांवर तंबूत परतला. त्याला फिरकीपटू नॅथन लायन याने बाद केले. राहुल (KL Rahul) याला या चालू मालिकेत एकदाही मोठी धावसंख्या उभारता आली नाहीये. त्याने पहिल्या कसोटीत फक्त 20 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात भारतीय संघाने फलंदाजी केली नव्हती.

राहुलची कामगिरी मागील काही काळापासून इतकी खराब आहे की, त्याने खेळलेल्या अखेरच्या नऊ कसोटी डावात 30 धावांचा आकडा पार केला नाहीये. अशात त्याला संघाबाहेर जावे लागू शकते. लवकरच अंतिम 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे. सुरुवातीला मालिकेतील फक्त पहिल्या दोन कसोटीसाठीच संघाची घोषणा झाली होती.

राहुलच्या या कामगिरीनंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. एका चाहत्याने ट्विट करत लिहिले,

https://twitter.com/KSR1998/status/1626841356500094978?t=dVuDOO0uO2LPqeVS7mirhw&s=19

‘माझी बीसीसीआयला विनंती आहे की तुम्ही राहुलला हनिमूनला जाण्याची परवानगी द्यावी.’ अन्य एका चाहत्याने लिहिले, ‘सध्या राहुल पेक्षा उत्कृष्ट फलंदाजी तर अश्विन करतोय.’

राहुल याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत त्याने लग्न गाठ बांधली. मात्र, त्यानंतर तो लगेच भारतीय संघात सामील झाला होता.

(Fans Troll KL Rahul After His Continues Bad Performance In Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

इमर्जन्सीमध्ये संघात आला आणि विराटची ‘ड्रीम विकेट’ घेऊन गेला, कुह्नेमनचे दमदार पदार्पण
जबरदस्त! जिमी अन् ब्रॉडचा जागतिक क्रिकेटमध्ये राडा, मोडला वॉर्न-मॅकग्रा जोडीचा ‘तो’ World Record

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---