Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इमर्जन्सीमध्ये संघात आला आणि विराटची ‘ड्रीम विकेट’ घेऊन गेला, कुह्नेमनचे दमदार पदार्पण

February 18, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Cricket Australia

Photo Courtesy: Twitter/Cricket Australia


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने ‌‌‌263 धावा उभ्या केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ 262 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्याचवेळी भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याला बाद देण्याचा निर्णय काहीसा वादग्रस्त ठरला. मात्र, त्याला बाद करणाऱ्या मॅथ्यू कुह्नेमन याच्यासाठी मात्र ही कामगिरी स्वप्नवत ठरली. कारण, पदार्पण करणाऱ्या कुह्नेमन याच्यासाठी हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी होता.

भारतीय संघाचे पहिले चार फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहली हा भारताचा डाव पुढे घेऊन चालला होता. मात्र, तो 44 धावांवर असताना बाद झाला. त्याला पायचित पद्धतीने बाद देण्यात आले. हा पदार्पण करणाऱ्या कुह्नेमन याच्यासाठी पहिला बळी ठरला. विशेष म्हणजे विराट नागपूर कसोटीत पदार्पण केलेल्या टॉड मर्फी याच्याविरुद्ध देखील बाद झालेला.

कुह्नेमन हा या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग नव्हता. मात्र, नागपूर येथील पहिल्या कसोटीनंतर त्याला तातडीने संघात सामील करण्यात आले. त्यानंतर त्याने दिल्ली येथे थेट आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले. विराट आपल्या कारकिर्दीत तब्बल 20 व्या वेळी पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाविरुद्ध बाद झाला आहे. तर कगिसो रबाडा, एस. मुथुस्वामी, अल्झारी जोसफ व कुह्नेमन यांचा तो पहिला आंतरराष्ट्रीय बळी ठरला आहे. श्रीलंकेचा माहेला जयवर्धने, भारताचे मोहम्मद अझरुद्दीन व बांगलादेशचा महमदुल्लाह हे प्रत्येकी 23 वेळा पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाविरुद्ध बाद झाले आहेत.

(Matthew Kuhnemann Took His First Wicket In International Cricket As Virat Kohli In Delhi Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदान भारताचं, पण हवा लायनची! कसोटीत ‘बाप’ कामगिरी करणारा नेथन दुसराच, पहिल्या स्थानी ‘हा’ भारतीय
आता बास झालं! फ्लॉप शोमुळे राहुल होणार कसोटी संघातून बाहेर? शेवटच्या 9 डावातील कामगिरी लज्जास्पद


Next Post
Virat-Kohli

आधी बॅट की पॅड? पंचांनी बाद दिल्यानंतर विराटची ड्रेसिंग रूममध्ये आगपाखड, पाहा व्हिडिओ

Photo Courtesy: Twitter/ICC

अश्विन-अक्षरमुळे दिल्ली कसोटी रंगतदार अवस्थेत! दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची वेगवान सुरुवात

Photo Courtesy: Twitter/BCCI Womens

टी20 विश्वचषक: इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेक टीम इंडियाच्या बाजूने, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143