Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

याला म्हणतात फिटनेस! राहुलने टिपलेल्या ‘लाजवाब’ कॅचने ख्वाजा तंबूत, पाहा व्हिडिओ

February 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy:Twitter/BCCI

Photo Courtesy:Twitter/BCCI


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात झाली. अरुण जेटली स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दोन सत्रात 6 गडी गमावत 199 धावा केल्या. मोहम्मद शमी तसेच रविचंद्रन अश्विन यांनी शानदार गोलंदाजी केली. मात्र, त्याचवेळी भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल याने टिपलेला एक झेल डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनी 50 धावांची भागीदारी केली.‌ त्यानंतर ख्वाजा व‌‌ लॅब्युशेन यांनी 41 धावांची भागीदारी केली. मात्र, रविचंद्र अश्विन याने लॅब्युशेन व अनुभवी स्टीव्ह स्मिथ यांना केवळ तीन चेंडूंच्या अंतराने तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी घडवून आणली. एका बाजूने इतर फलंदाज बाद होत असताना ख्वाजा याने अर्धशतक साजरे केले.

ICYMI – WHAT. A. CATCH 😯😯

WOW. A one-handed stunner from @klrahul to end Usman Khawaja’s enterprising stay!#INDvAUS pic.twitter.com/ODnHQ2BPIK

— BCCI (@BCCI) February 17, 2023

 

त्याने अतिशय कल्पकतेने भारतीय गोलंदाजांचा सामना करत शतकाकडे मजल मारण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्याचवेळी 81 धावांवर असताना त्याने रवींद्र जडेजा विरुद्ध रिव्हर्स स्विपचा फटका मारला. चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध आलेला. मात्र, स्क्वेअर लेगच्या ठिकाणी तैनात असलेल्या राहुलने‌ उजवा बाजूला झेपावत एक शानदार झेल पूर्ण केला. या आधी देखील त्याने एक झेल टिपला होता.

अनेक समीक्षक राहुलसाठी हा सामना करो अथवा मरो असल्याचे म्हणत आहेत. कारण, तो मागील वर्षभरापासून सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. नागपूर येथील पहिल्या कसोटीतही तो केवळ वीस धावा करू शकलेला.

(KL Rahul Took Stunning Catch Of Usman Khwaja In Delhi Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

पुजाराचा शंभराव्या कसोटीबद्दल गावसकरांकडून खास सन्मान, व्हिडिओत दिसला भारतीय क्रिकेटचा इतिहास
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन


Next Post
Stuart Broad and James Anderson

द लिजेंड्स! ऍंडरसन-ब्रॉड जोडीने एकत्रित मिळवले 1000 कसोटी बळी, बनले इतिहासातील केवळ दुसरीच जोडी

Photo Courtesy: Twitter/BCCI

दिल्ली कसोटी: पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया सर्वबाद 263, शमीचा बळींचा चौकार

MS-Dhoni-and-Hardik-Pandya

BREAKING: 31 मार्चपासून उडणार आयपीएल 2023 चा धुरळा, सीएसके-गुजरातमध्ये रंगणार उद्घाटनाचा सामना

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143