भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना तिरुअनंतपुरम येथे रविवारी (26 नोव्हेंबर) खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात विक्रमी 235 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न 44 धावांनी कमी पडले. यासह भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने या सामन्यात जोरदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल व ऋतुराज गायकवाड यांनी संघाला केवळ 5.5 षटकात 77 धावा जोडून दिल्या. यशस्वीने 25 चेंडूमध्ये 53 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशनने देखील तसेच आक्रमक धोरण स्वीकारत 32 चेंडूवर 52 धावा चोपल्या. ऋतुराज गायकवाडने एक बाजू लावून धरत 43 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. अखेरीस सूर्यकुमारने दहा चेंडूत 19 तर रिंकूने केवळ 9 चेंडूंमध्ये 31 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाने 235 अशी मोठी धावसंख्या उभी केली.
या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियासाठी वरच्या फळीतील फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. मार्कस स्टॉयनिस (45), टीम डेव्हिड (37) व कर्णधार मॅथ्यू वेड (नाबाद 42)यांनी थोडाफार संघर्ष केला. रवी बिश्नोई व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाला रोखण्यात महत्त्वाचे भूमिका बजावली.
(India Beat Australia In Thiruvananthapuram T20 Jaiswal Ishan Ravi Shines)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 साठी RCB ने रिटेन केले धाकड 18! बडे विदेशी खेळाडू बाहेर
IPL 2024 Retention: मुंबई इंडियन्सचे रिटेन खेळाडू जाहीर, मोठ्या नावांना दिला नारळ, वाचा यादी