बेंगलोर | भारतीय हॉकी संघाने रविवारी (22 जुलै) तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील, तिसऱ्या सामन्यात न्युझीलंडवर ४-0 ने विजय मिळवला.
या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 ने विजय मिळवला.
या सामन्यात भारताकडून रुपिंदर पाल सिंह, सुरेंद्र कुमार, मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंगने गोल केले.
रुपिंदर पाल सिंहने आक्रमकपणे खेळ करत सामन्याच्या आठव्या मिनिटाला गोल करत भारताचे खाते उघडले. तर 15 व्या मिनिटाला सुरेंद्रने गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर भारतानेे या सामन्यावर एकहाती वर्चस्व राखत न्युझीलंडा एकही गोेल करण्याची संधी दिली नाही.
44 व्या मिनिटाल मनदीपने गोल करत भारताची 3-0 अशी आघाडी वाढवली. इकडे भारतीय संघ गोल वर गोल करत असताना न्युझीलंडला गोल करण्याची एकही संधी मिळत नव्हती.
या सामन्यात भारतीय संघाच्या बचावफळीने सर्वोत्तम कामगिरी करत न्युझीलंडला गोल करण्यापासून रोखले.
तर सामन्याच्या शेवटच्या क्षणातही भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. आकाशदीप सिंगने 60 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत न्युझीलंडच्या पराभवावर शिक्केमोर्तब केले.
या मालिका विजयाने 18 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशियाई क्रिडा स्पर्धेसाठी भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्किच वाढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-माजी विश्वविजेत्या जर्मनीचा फुटबॉलपटू ठरला वंशभेदाचा शिकार, आंतरराष्ट्रीय…