---Advertisement---

टीम इंडियाने केली संक्रांत गोड! श्रीलंकेला अवघ्या 73 धावांवर गुंडाळत मिळवला 317 धावांनी विश्वविक्रमी विजय

---Advertisement---

रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने अक्षरशा श्रीलंकेला नेस्तनाबूत केले. विराट कोहली याचे नाबाद दीडशतक व शुबमन गिल याच्या शतकानंतर, मोहम्मद सिराज याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने श्रीलंकेचा डाव अवघ्या 73 धावांवर गुंडाळला. यासह भारताने ही मालिका 3-0 अशी आपल्या नावे केली.

 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित आणि शुबमन (Shubman Gill) गिल या सलामीवीर जोडीने पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत संघाचा चांगली सुरुवात दिली. रोहित 42 धावा करून परतल्यानंतर गिल व विराट कोहली यांनी शानदार खेळ दाखवत श्रीलंकेला सामन्यातून मागे ढकलले. गिलने आपल्या वनडे कारकीर्दीतील दुसरे शतक पूर्ण करताना संघासाठी 97 चेंडूत 116 धावा केल्या. तर, विराट कोहली याने अखेरपर्यंत नाबाद राहत 110 चेंडूवर 166 धावा काढल्या.‌ या खेळीमध्ये 13 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. श्रीलंकेसाठी रजिथा व कुमारा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

भारताने ठेवलेले 391 या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव दुसऱ्या षटकापासून गडगडला. मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी या जोडीने श्रीलंकेच्या सर्वच फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. सिराजने अक्षरशहा त्यांच्या नावाची वाट पाहत करत चार बळी आपल्या‌ नावे केले. त्यानंतर कुलदीप यादव याने देखील श्रीलंकेचा कर्णधार शनाका याला बाद करत त्यांच्या उरल्यासुरल्या अपेक्षा धुळीस मिळवल्या. दुखापतीमुळे अशेन बंडारा मैदानावर न आल्याने अखेरीस श्रीलंकेचा डाव केवळ 9 बाद 73 धावांवर संपला. यासह भारताने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय संपादन केला.

(India Beat Srilanka By 317 Runs In 3rd ODI Virat Gill Siraj Shines)

महत्वाच्या बातम्या-
एकदमच टॉपला! सध्या खेळत असलेल्या खेळाडूंत कोणीही नाही विराटच्या आसपास; पाहा ही आकडेवारी
INDvSL: शुबमन गिलच्या शतकाआधी युवराज सिंगने म्हटले, ‘क्रिकेट मरतय का?’; जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---