भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) नुकतीच पार पडली. भारतीय संघाने मालिकेतील मोहाली येथे झालेला पहिला सामना १ डाव आणि २२२ धावांच्या फरकाने जिंकला होता. त्यानंतर बंगळुरू येथील दुसरा दिवस-रात्र कसोटी सामनाही भारतीय संघाच्या पारड्यात पडला. भारतीय संघाने २३८ धावांनी हा सामना जिंकला आहे. अशाप्रकारे भारताने २-० च्या फरकाने श्रीलंकेला व्हाईटवॉश (Whitewash To Sri Lanka) दिला आहे.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) अव्वलस्थानी प्रगती होत भारतीय संघाला या विजयाचा फायदा झाला आहे. असे असले तरीही, भारतीय संघाला लवकरच हे स्थान गमवावेही लागू शकते. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटी सामना (Karachi Test) जिंकत भारताला हटवून पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. परंतु पाकिस्तानच्या संघाने हा सामना जिंकला तर भारतच अव्वलस्थानी कायम राहू शकतो. (India Becomes No One Team In ICC Test Rankings But Australia Can Reclaim No One Spot)
आयसीसीच्या अधिकृत कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक ११९ गुणांसह संघाच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतीय संघाकडे ११६ गुण असून हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसी बुधवारी (१६ मार्च) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर करेल. यामध्ये भारत विरुद्ध श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील सामन्यांच्या निकालानुसार बदल होऊ शकतात.
पाकिस्तानचा विजय गरजेचा
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात कराची येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर कसोटी क्रमवारीतील स्थिती स्पष्ट होईल. ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना जिंकला तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरेल आणि ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा पहिल्या क्रमांकावर कायम राहिल. तर पाकिस्तानचा संघ सहाव्या क्रमांकावर कायम असेल.
जर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या कसोटी मालिकेतील तिन्ही सामने अनिर्णीत राहिले तर, भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. अशा स्थितीत भारताच्या खात्यात ११६ गुण असतील, तर ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे ११५ गुण असतील. जर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेतील प्रत्येकी १ सामनाही जिंकला, तरीही आयसीसी क्रमवारीतील भारताची स्थिती कायम राहिल.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेट झालं तब्बल १४५ वर्षांचं! कसा झाला होता सर्वात पहिला सामना, घ्या जाणून
‘मैं हारेगा नहीं साला’, माजी क्रिकेटरने पुष्पा स्टाईलमध्ये सांगितला कर्णधार रोहित शर्माचा इरादा
आयसीसीचा श्रेयस अय्यरला सलाम, निवडले फेब्रुवारीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू; महिलांमध्ये ‘ही’ ठरली विजेती