---Advertisement---

कसोटी क्रिकेट झालं तब्बल १४५ वर्षांचं! कसा झाला होता सर्वात पहिला सामना, घ्या जाणून

On: मंगळवार, मार्च 15, 2022 2:32 PM
---Advertisement---

क्रिकेट इतिहासात (Cricket History) १५ मार्च हा दिवस खास आहे, कारण आजपासून १४५ वर्षांपूर्वी म्हणजेच १८७७ साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. या दोन संघांमधील हा पहिला सामना मेलबर्न येथे १५ मार्च ते १९ मार्च दरम्यान खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांतील खेळांडूंनी अनेक विक्रम केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बेनरमॅनने (Charles Bannerman) जबरदस्त फलंदाजी करत कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले होते, तर सामन्यातील पहिला चेंडू अल्फर्ड शाॅने टाकला. या लेखात आपण पहिल्या कसोटी सामन्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाचा सुरुवात काही खास झाली नाही, पहिली विकेट अवघ्या २ धावांवरच गेली होती. ती विकेट होती नेट थाॅमसन यांची, ते एक धाव करुन बाद झाला. त्यानंतर टाॅम होरेन १२ धावा तंबुत परतले. ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधार डेव ग्रेगोरी यांनी सुद्धा या सामन्यात एकच धाव काढली. ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज एक-एक करुन सगळेच बाद होत असताना चार्ल्स शतक लगावण्यात यशस्वी झाले, त्यांनी या सामन्यात १६५ धावा केल्या. ब्रांसबी कूपर १५, जॅक ब्लॅकहम १७ आणि टाॅम गॅरेट यांनी १८ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या डावात २४५ धावा केल्या. या दरम्यान इंग्लंड संघाच्या अल्फर्ड शाॅ आणि जेम्स साउथरट यांनी ३-३ विकेट घेतल्या.

इंग्लंड आपल्या पहिल्या डावात १९६ धावा करुन सर्वबाद झाला. इंग्लंड संघाकडून हॅरी जप यांनी ६३, हॅरी चार्लवुड यांनी ३६ आणि ऍलन हिल यांनी ३५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बिली मिडविंटर यांनी ५ विकेट घेतलेत. त्याच्या शिवाय टाॅम गॅरेट यांनी ३ विकेट घेतल्या. पहिल्या डावात इंग्लंड संघ ऑस्ट्रेलिया संघापेक्षा ४९ धावांनी मागे राहिला.

दूसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने १०४ धावा केल्या. पहिल्या डावात शतक लगावणाऱ्या चार्ल्स यांनी दूसऱ्या डावात ४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ३५ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. पण टॉम होरेन २०, मिली मिडविंटर १७ आणि टॉम केंडल यांनी १७ धावा केल्या. इतर खेळाडू काही विशेष कामगिरी करु शकले नाहीत. इंग्लंडच्या अल्फर्ड शाॅ यांनी ५ विकेट घेतल्या.

त्यानंतर १५३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचा डाव १०८ धावांवरच संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने ही कसोटी ४५ धावांनी जिंकली. सलामीवीर फलंदाज ऍलन हिल ० धावा करुन बाद झाले. जॉन सेल्बी यांनी ३८ तर जॉर्ज यूलियट यांनी सर्वाधिक २४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या टॉम केंडल यांनी ७ विकेट घेतल्या.

कसोटी क्रिकेट इतिहास
क्रिकेटची सुरुवात १६ व्या शतकात झाली. क्रिकेटचा जनक म्हणून इंग्लंडला ओळखले जाते. परंतु, यावर अजूनही मतभेद आहेत. काहींचे म्हणणे असे आहे की, क्रिकेटची सुरुवात अमेरिकेमध्ये झाली आणि नंतर त्याचा विस्तार इंग्लंडमध्ये झाला. या दरम्यान इंग्लंडमध्ये काही क्रिकेट काउंट्री अस्तित्वात आल्या. १७८७ मध्ये मेरिलबोन क्रिकेट क्लबची स्थापना करण्यात आली. कसोटी क्रिकेट सुरू होण्यापुर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत होते. हे असेच अनेक दशके चालले आणि नंतर १५ मार्च १८७७ साली पहिली कसोटी सामना खेळला गेला.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२२ मध्ये सामन्यात मिळणार चार डीआरएस, नवीन नियम जाहीर; वाचा सविस्तर

ना धोनी, ना कोणी; केवळ ‘यष्टीरक्षक’ रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये साधलाय ‘तो’ पराक्रम

हीच ती वेळ, हाच तो क्षण..! कोट्यवधी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण, पाहा तो सुंदर व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---