टी२० विश्वचषकामध्ये रविवारपासून (२४ ऑक्टोबर) भारत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होईल. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. गेल्या काही वर्षांत आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीत भारतीय संघाचे आत्तापर्यंत खराब प्रदर्शन राहिले असूनही भारत यावेळी टी-२० विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने म्हटले आहे की, भारत विश्वचषक जिंकू शकतो, पण तीन संघांपासून भारतीय संघाला सावध राहावे लागेल.
वेस्टइंडिजपासून राहावे लागेल सावध
गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत दोनवेळच्या विश्वविजेता संघ वेस्टइंडिजने भारताला स्पर्धेबाहेर काढले होते. गतविजेता वेस्ट इंडिज संघावर भारतीय संघाला लक्ष ठेवावे लागेल, असे भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाला वाटते. वेस्टइंडिज संघाने उपांत्य फेरीत भारताचा पराभव केल्यानंतर वेस्ट इंडिजने अंतिम सामन्यात इंग्लंडवर रोमहर्षक विजय नोंदवून जेतेपद पटकावले होते.
माध्यमांशी बोलताना रैना म्हणाला, वेस्ट इंडीज निर्भयपणे क्रिकेट खेळणारा संघ आहे, जर, त्यांच्याशी सामना झाला तर, भारताला विशेषत: पॉवरप्लेमध्ये विकेट घ्याव्या लागतील. वेस्ट इंडीजकडे साधारण १० व्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत. याशिवाय मोठे फटके खेळणारे खेळाडू देखील आहेत.
नवखा श्रीलंका संघ त्रासदायक ठरू शकतो
सुरेश रैना पुढे म्हणाला, श्रीलंका हा दुसरा संघ असेल जो भारतासाठी धोका ठरू शकतो. जुलैमध्ये भारताला टी -२० मालिकेत पराभूत केले होते. श्रीलंकेने अलीकडेच त्यांचा पात्रता फेरीतील सामने जिंकून सुपर १२ मध्ये स्थान मिळवले आहे. रैना पुढे म्हणाला, एक महत्वाची बाब म्हणजे श्रीलंकेच्या युवा आणि गुणवंत खेळाडूंबद्दल इतर संघांना फारशी माहिती नाही. म्हणून भारताला सावधगिरी बाळगण्याचे एक मोठे कारण असू शकते.
अफगाणिस्तानच्या फिरकी माऱ्यापासून राहावे लागेल सावध
सुरेश रैनाने अफगाणिस्तानला विश्वचषकातील तिसरा धोकादायक संघ सांगितला आहे. अफगाणिस्तानचे फिरकीपटू सामन्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात, यामुळे त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे, असे मत रैनाने व्यक्त केले आहे. रैना म्हणाला, अफगाणिस्तान आणि श्रीलंका सारखे इतरही संघ आहेत, ज्यांच्याबद्दल कोणी फारसे बोलत नाही. श्रीलंकेच्या संघाने तर या वर्षाच्या सुरुवातीला टी २० मालिकेत भारताचा पराभव केला होता.
दरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारताला सुपर १२ फेरीत या तीन संघांपैकी केवळ अफगाणिस्तान संघाचा सामना करायचा आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेशी भारताचा तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा हे तिन्ही संघ बाद फेरीत प्रवेश करतील आणि आमने-सामने येतील.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल तीन वर्षांपासून फुस्स ठरतोय फिंच; नावावर झाली ही लाजीरवाणी आकडेवारी
“हार्दिकने गोलंदाजी केली नाही, तरी तो मॅन विनर”, विराटचे टीकाकारांना प्रत्युत्तर






