---Advertisement---

हा दिग्गज म्हणतो, टीम इंडियाला महान होण्यासाठी करावी लागले ही गोष्ट

On: रविवार, मार्च 1, 2020 7:18 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी मालिकेदरम्यान संघर्ष करावा लागत आहे. भारताने न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामन्यात पराभव स्विकारला आहे. तर सध्या क्राईस्टचर्च येथे सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना मोठ्या धावा करण्यात अपयश आले आहे.

भारताची ही कामगिरी पाहून इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी ट्विट करत म्हटले आहे की जर भारतीय संघाला एक महान संघ बनायचा असेल तर त्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये विजय मिळवावा लागेल.

वॉन यांनी ट्विट केले आहे की ‘न्यूझीलंड भारताला अशा परिस्थितीत कसे खेळायचे हे शिकवत आहे. जेथे बॉल हवेत तरंगतो… जर भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये जिंकू शकत नसेल तर भारत एक उत्कृष्ट संघ मानला जाऊ शकत नाही.’

https://twitter.com/MichaelVaughan/status/1233663106682933248

सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 242 धावा केल्या आहेत. तर न्यूझीलंडला पहिल्या डावात 235 धावांवर रोखत 7 धावांची आघाडी घेतली आहे. तसेच आज(1 मार्च) दुसऱ्या दिवसाखेर पर्यंत भारताला दुसऱ्या डावात 6 बाद 90 धावा करता आल्या आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1234107348416856064

https://twitter.com/Maha_Sports/status/1234084210442428416

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---