दक्षिण कोरियाची राजधानी बुसान येथे झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने आपले विजेतेपद राखले. संघर्षपूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इराणचा 42-32 असा पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. यासह भारतीय संघाने अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. भारतीय संघ आठव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
🇮🇳 India win Asian Kabaddi Championship Title!#TeamIndia beat Iran 42-32 in final of Asian Kabaddi Championship 2023 in Busan, South Korea. This is India’s 8th title in nine editions. pic.twitter.com/CThF6RSEau
— All India Radio News (@airnewsalerts) June 30, 2023
भारताने स्पर्धेतील साखळी फेरीच्या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. पवन सेहरावतच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अनुक्रमे यजमान कोरिया, चायनीज तैपई, जपान, इराण व हॉंगकॉंग यांना पराभूत केले होते.
अंतिम सामन्यात भारतीय संघ सुरुवातीला पिछाडीवर आला होता. मात्र, बचावपटूंनी काही सुपर टॅकल करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यानंतर कर्णधार पवन व अस्लम इनामदार यांनी भारतीय रेडींगची जबाबदारी खांद्यावर घेतली. दोघांनी आक्रमक खेळ दाखवत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. दहाव्या आणि 19 व्या मिनिटाला इराणला ऑल आउट करत भारताने पहिल्या सत्राच्या अखेरीस 23-11 अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या हाफमध्ये भारताने आपली हीच आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न केला. काही सांग संत खेळ केल्याने भारताला फटका बसला. मात्र, अखेरीस भारतीय संघ 42-32 असा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
(India Clinch Asian Kabaddi Championship 8th Time Best Iran In Finals)
महत्वाच्या बातम्या-
‘अरे भावा, कुठल्या लाईनमध्ये घुसलास तू?’, रहाणेच्या लेटेस्ट व्हिडिओवर चाहत्याची कमेंट, पत्नीही म्हणाली…
रहाणेला पुन्हा उपकर्णधार बनवल्याने गांगुली हैराण! माजी कर्णधारचे मोठे विधान