ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईत निधन झाले. जोन्स स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आले होते. ते ५९ वर्षांचे होते.
डीन जोन्स हे सक्रिय क्रिकेट विश्लेषक होते. सध्या युएईमध्ये सुरूअसलेल्या आयपीएलमध्ये टेलिव्हिजनवर समालोचन करण्यासाठी स्टार स्पोर्ट्ने त्यांच्याशी करार केला होता. जोन्स हे भारतीय प्रसारमाध्यमांतील एक लोकप्रिय व्यक्ती होत. त्यांचा ‘प्रोफेसर डिनो’ हा एनडीटीव्हीवरील कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होता. ते जगभरातील विविध लीगमध्ये समालोचन करत. जोन्स आपल्या स्पष्ट व परखड टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध होते.
जोन्स हे ट्विटरवर अतिशय सक्रिय समालोचकांपैकी एक होते. ४ लाख फॉलोवर्स असलेल्या जोन्स यांनी २५ हजार ट्विट केले होते.
एका चाहत्याने त्यांना ट्विट केला होता. त्यात चाहत्याने त्यांच्या समालोचनावर काहीतरी प्रतिक्रीया व्यक्त केली होती. नंतर तो ट्विट चाहत्याने डिलीट केला. यावर डीन जोन्स यांनी ‘तू हे पहात आहे याचा आनंद आहे. माझे समालोचन म्युट करुन जरी सामना पाहिला तरी चालेल’ असे उत्तर दिले होते.
Glad you are watching… just hit the 🆒 #mute button ! 😜 https://t.co/ssqHMJn1X7
— Dean Jones AM (@ProfDeano) September 23, 2020
यावर अभिजीत चौधरी या मराठी क्रिकेटप्रेमीने ‘त्या चाहत्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही छान समालोचन करता. तुम्हाला ऐकणे ही एक चांगली गोष्ट आहे.’ असा ट्विट केला.
Ignore him you are doing awesome Dean !!! Love to hear 👍
— ABHIJIT !!! (@tweetuabhi) September 23, 2020
यावर या महान खेळाडू अतिशय महत्त्वाचा संदेश दिला. ‘ठिक आहे. परंतू लोकांना त्याचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे.’ असा ट्विट त्यांनी केला होता.
All good.. people are allowed to have their opinions! 👍🏻 https://t.co/l3q2spa0Dt
— Dean Jones AM (@ProfDeano) September 23, 2020
भारताच्या सर्वच आजी माजी क्रिकेटपटूंनी जोन्स यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेंचा समावेश आहे.
Absolutely heartbreaking news about Dean Jones passing away.
A wonderful soul taken away too soon. Had the opportunity to play against him during my first tour of Australia.
May his soul rest in peace and my condolences to his loved ones. 🙏🏼 pic.twitter.com/u6oEY1h7zz— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 24, 2020
Shocked to hear about the tragic loss of Dean Jones. Praying for strength and courage to his family and friends. 🙏🏻
— Virat Kohli (@imVkohli) September 24, 2020
Shocking news to hear about passing away of Dean Jones 😞 #RIP
— Rohit Sharma (@ImRo45) September 24, 2020
Shocked and deeply saddened to hear about the sudden demise of Dean Jones. My condolences to his friends and family 🙏
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) September 24, 2020
Very, very sad news. Rest in Peace, Professor Deano. Sending my condolences to his loved ones.
— hardik pandya (@hardikpandya7) September 24, 2020
Tragic news. Rest in Peace, Professor. My condolences to the family of Dean Jones.
— Shikhar Dhawan (@SDhawan25) September 24, 2020
#Deanjones #gonetosoon may his soul rest in peace
— Murali Vijay (@mvj888) September 24, 2020
मेलबर्न येथे जन्मलेल्या जोन्स यांनी ऑस्ट्रेलियासाठी ५२ कसोटीत ४६.५५ च्या सरासरीने ३,६६१ धावा काढल्या. त्यांच्या नावे ११ आंतरराष्ट्रीय कसोटी शतके होती. ऍलन बॉर्डरच्या यांच्या संघाचे ते महत्त्वपूर्ण सदस्य मानले जात. जोन्स यांनी १६४ एकदिवसीय सामने खेळत सात शतके आणि ४६ अर्धशतकांच्या मदतीने ६,०६८ धावा केल्या. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्वात पहिल्यांदा यशस्वी ठरलेल्या खेळाडूंपैकी ते एक होते. ऑस्ट्रेलियाने १९८७ मध्ये जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकावेळी ते ऑस्ट्रेलियन संघाचे सदस्य होते.