अंडर 19 एशिया कप स्पर्धेला 29 सप्टेंबरपासून बांग्लादेशात सुरू झाली. भारतीय अंडर 19 संघाने 29 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात नेपाळचा 227 धावांनी पराभव केला होता. सावर येथे झालेल्या सामन्यात यशस्वी जसवालच्या 104 धावांच्या बळावर भारताने नेपाळपुढे 304 धावांचे विशाल लक्ष ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ 133 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताच्या अंडर 19 च्या संघाने 172 धावांनी विजय मिळवला होता.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी 30 सप्टेंबरला युएईसोबत झालेल्या सामन्यात भारत-19 संघाने 227 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय-19 संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 50 षटकात 354 धावा केल्या. सलामीवीर अनुज रावत आणि देवदूत पडीक्कल यांनी 205 धावांची सलामी दिली. अनुजने 115 चेंडूत 102 आणि देवदुतने 115 चेंडूत 121 धावांच्या शतकी खेळ्या केल्या.
प्रतित्युतरात युएई-19 संघाने 127 धावा केल्या. नियमीत अंतराने त्यांचे गडी बाद होत गेल्याने त्यांचे आव्हान 33.5 षटकात संपुष्टात आले.
भारतीय-19 संघाकडून सिद्धार्थ देसाईने 8.5 षटकात 6 फलंदाजांना बाद केले.
काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका -19 संघाने हॉंगकॉंग-19 संघाचा 10 विकेटने पराभन केला.
2 ऑक्टोबरला भारत-19 आणि अफगाणिस्तान -19 यांच्यात साखळीतील शेवटचा सामना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भारतीय कसोटी संघात समावेश झालेला खेळाडू म्हणतोय, माझ्यावर द्रविडचा प्रभाव
-“पाकिस्तानला एकही रुपया देणार नाही”- अनुराग ठाकूर
-आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लिओनचा पाकिस्तानला दणका क्रिकेटमध्ये भीमपराक्रम