सध्या भारत आणि बांगलादेश या संघात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम याथे खेळवला जात आहे. शुक्रवारी या सामन्याचा तिसऱ्या दिवशी भारताने 2 बाद 258 धावांवर डाव घोषीत केला आणि दिवसाअखेर बांगलादेशने एकही गडी न गमावता 42 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी भारताच्या शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी झंझावती शतके झळकावली.
तिसऱ्या दिवशी बांगलादेशने 8 गडी 133 या धावसंख्यापासून खेळ सुरु केला. त्यांचे उर्वरीत गडीही लवकर बाद झालेे आणि संघ 150 धावांवर गारद झाला. त्यानंंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. केएल राहुल (KL Rahul) 23 धावा करत तंबूत परतला. त्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी भारताचा डाव सांभाळला. धमाकेदार फलंदाजीचे प्रदर्शन करत शुबमन गिल याने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. त्याने 152 चेंडूत 110 धावा केल्या. यात त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 3 खणखणीत षटकार बघायला मिळालेे. त्याला पुजारानेही उत्तम साथ दिली. पुजारानेे आपल्या कसोटी कारकीर्दीतील 19वे शतक झळकावले. पहिल्या डावात तो 90 धावांवर बाद झाल्याने शतक हुकले होते. मात्र, या डावात त्याने ही संधी सोडली नाही. त्याने 130 चेंडूत 102 धावा केल्या. त्यानंतर भारताने 2 बाद 258 या धावसंंख्येवर आपला डाव घोषीत केला. त्यानंतर दिवस संपेपर्यंत बांगलादेशने बिनबाद 42 धावा केलेल्या.
आता या कसोटी सामन्याचे दोन दिवस शिल्लक आहेत आणि बांगलादेश संघाला जिंकण्यासाठी 471 धावांची गरज आहेे. दिवस संपला त्यावेळी बांगलादेशचे नजमुल शंटो (Najmul Hossain Shanto) आणि झाकीर हसन (Zakir Hasan) फलंदाजी करत होते. शंटो 42 चेंडूत 25 धावा आणि झाकीर 30 चेंडूत 17 धावा करत नाबाद आहेत.(India declared second innings on 258 runs and now Bangladesh need 471 runs to win this match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे बाप! अवघ्या 15 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला ‘हा’ संघ, 5 फलंदाज शून्यावर तंबूत
सईद अजमलची खळबळजनक प्रतिक्रिया; म्हणाला,’…तर भारताविरुद्ध माझा शेवटचा सामना ठरला असता’