fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या बाबतीत असे तिसऱ्यांदाच घडले

मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात आज चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 बाद 44 धावा केल्या आहेत. त्यांना अजून विजयासाठी 355 धावांची गरज आहे.

तत्पूर्वी भारताने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावातील 292 धावांच्या आघाडीसह 399 धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले.

या सामन्यात भारताने पहिला डावही 7 बाद 443 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे परदेशात कसोटी क्रिकेट खेळताना एकाच सामन्यातील दोन्ही डाव घोषित करण्याची ही भारताची फक्त तिसरी वेळ आहे.

याआधी परदेशात खेळताना भारताने असे दोनदा केले आहे. 2004मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी कसोटीत भारताने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळताना दोन्ही डाव घोषित केले होते.

त्यावेळी भारताने पहिला डाव 7 बाद 705 धावांवर घोषित केला होता. या डावात व्हीव्हीएस लक्ष्मणने शतक आणि सचिन तेंडुलकरने द्विशतक केले होते. तर दुसरा 2 बाद 211 धावांवर घोषित केला होता. त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलिया समोर 443 धावांचे आव्हान ठेवले होते. पण हा सामना अनिर्णित राहिला

यानंतर 2007 मध्ये बांगलादेश विरुद्ध चितगावमध्ये खेळताना भारताने दोन्ही डाव घोषित केले होते. त्यावेळी द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला डाव 7 बाद 387 धावांवर घोषित केला होता. या डावात गांगुली आणि तेंडुलकरने शतके केली होती. तर दुसरा डाव 6 बाद 100 धावांवर घोषित करत बांगलादेशला 250 धावांचे लक्ष दिले होते. हा सामनाही अनिर्णित राहिला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

जगातील सर्वच कर्णधारांसाठी हे वर्ष ठरले अतिशय खराब

रोहितचा नादच खुळा! या कारणामुळे आहे टीम इंडियासाठी लकी

Video: कर्णधार टिम पेनची बडबड थांबेना, आता रिषभ पंतला केले टार्गेट

You might also like