टी20 विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) हा सामना खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 134 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिके पुढे ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला धक्के बसले. मात्र, त्यानंतर डेव्हिड मिलर व ऐडन मार्करम या जोडीने शानदार खेळ दाखवत संघाला 5 गडी राखून विजय मिळवून दिला. या पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत असली तरी, दक्षिण आफ्रिकेकडून झालेला पराभव हा भारताच्या विश्वचषक विजयाचे संकेत असल्याचे दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ विश्वचषक जिंकणार असल्याचे काही संकेत मिळताना दिसतायेत. इतिहासातील काही घटनांचे दाखले देत हा दावा केला जातोय. 2011 मध्ये भारतीय संघाने अखेरच्या वेळी वनडे विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकातही भारताने दक्षिण आफ्रिकेकडून एकमेव पराभव स्वीकारला होता. त्यानंतर प्रत्येक वेळी भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकात विजय मिळवण्यात यश आले आहे. यातील दुसरी घटना म्हणजेच 2011 विश्वचषकामध्ये आयर्लंडने इंग्लंडला पराभूत करण्याची किमया करून दाखवलेली. हाच शुभसंकेत मानून भारताच्या विजयाची अपेक्षा केली जात आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, सुपर 12 फेरीत ब गटातील सर्वात महत्त्वाचा असलेल्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेले. मात्र दक्षिण आफ्रिकेच्य गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत भारताचा डाव केवळ 133 धावांवर रोखला. भारतातर्फे सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे तीन बळी केवळ 24 धावात गेलेले. मात्र, ऐडन मार्करम व डेव्हिड मिलर या जोडीने 76 धावांची भागीदारी केली. परंतु, मिलरने अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला पाच गडी राखून विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! टी20 विश्वचषकातील सर्व चॅम्पियन संघ हरले, यंदा मिळणार नवा विजेता?
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…