---Advertisement---

टीम इंडियापुढे श्रीलंका नेहमीच ढेर! शानदार विजयासह वनडे इतिहासात ‘रोहित ब्रिगेड’ टॉपला

On: गुरूवार, जानेवारी 12, 2023 9:26 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना गुरुवारी (12 जानेवारी) खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून विजय नोंदवला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी देखील घेतली. त्याचबरोबर भारतीय संघाने वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

गुवाहाटी येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला होता. कोलकाता येथील या दुसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी परिश्रम करावे लागले. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर फलंदाजांच्या चिवट खेळाने भारतातील 216 धावांचे लक्ष सहा गडी गमावत पूर्ण केले. भारतीय संघाचा हा श्रीलंकेवरील 95 वा वनडे विजय ठरला.

एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने आपले शेजारी न्यूझीलंडविरुद्धही 95 वनडे विजय संपादन केले आहेत. श्रीलंकेविरुद्धच 92 विजय मिळवलेला पाकिस्तान तिसऱ्या, तर इंग्लंड विरुद्धच्या 87 विजयांसह ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानी विराजमान आहे. यासोबतच श्रीलंकेने भारताविरुद्ध मागील 10 द्विपक्षीय वनडे मालिकेत एकदाही विजय मिळवलेला नाही.

दुसऱ्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. पुनरागमन करत असलेला कुलदीप यादव व मोहम्मद सिराज यांनी भारतासाठी प्रत्येकी तीन बळी मिळवले. श्रीलंकेसाठी पदार्पण करणाऱ्या नुवानिदू फर्नांडो याने अर्धशतक साजरे केले.

या धावांचा पाठलाग करताना भारताचे पहिले चार फलंदाज केवळ 86 धावांवर माघारी परतले होते. मात्र, हार्दिक पंड्या व केएल राहुल यांनी पाचव्या गड्यासाठी 75 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. राहुलने अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला चार गडी राखून विजय मिळवून दिला.

(India Defeat Srilanka 95 Times In ODI Equal Australia Record)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तोंड आवर हार्दिक! चालू सामन्यात केली आपल्याच खेळाडूला शिवीगाळ; पाहा व्हिडिओ
मागील दोन वर्षांत सिराजच ठरलाय टीम इंडियाच्या गोलंदाजीचा ‘सरताज’! आकडे हेच सांगतात  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---