भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना ग्वाल्हेर या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
भारताने 14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमधील क्रिकेट सामन्यात विजयाची नोंद करून संस्मरणीय पुनरागमन केले. भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत बांगलादेशचा पहिला डाव 127 धावात गुंडाळला होता. यानंतर आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला. आता दुसरा टी20 सामना (9 ऑक्टोबर) रोजी अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळला जाणार आहे.
बांगलादेशने दिलेल्या 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 11.5 षटकांत 3 गडी गमावून 132 धावा ठोकल्या. युवा सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) लवकर बाद झाला. पण रनआउट होण्यापूर्वी त्याने 7 चेंडूत 16 धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसन (Sanju Samson) 19 चेंडूत 29 धावा करून बाद झाला, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 14 चेंडूत 29 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 39 धावा केल्या तर नितीश कुमार रेड्डी 16 धावा करून नाबाद परतला.
भारतासाठी अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू वरूण चक्रवर्तीनेही 3 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर, मयंक यादव (Mayank Yadav) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनीही प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
“धर्मानंतर क्रिकेट पुढे…” प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना काय म्हणाला पाकिस्तानी कर्णधार
IND vs BAN; पदार्पण सामन्यातच ‘या’ स्टार खेळाडूने रचला इतिहास!
IND vs PAK; भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून शानदार विजय