IND vs PAK :- भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या दरम्यान क्रिकेटच्या मैदानावर चांगली स्पर्धा रंगते. शेजारी आणि कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही देशातील सामने पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानावर हजेरी लावतात. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघादरम्यान मागील दीड महिन्यात चार सामने रंगले. यातील तीन सामन्यात भारतीय संघाने आपला दबदबा राखत दणदणीत विजय मिळवले.
न्यूयॉर्क येथे टी20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सामना 9 जून रोजी खेळला गेला. अतिशय महत्त्वाच्या या सामन्यात पाकिस्तानने भारताला 118 धावांवर रोखण्यात यश मिळवले होते. मात्र, त्यानंतरही भारतीय गोलंदाजांनी सर्वश्रेष्ठ कामगिरी करताना पाकिस्तानला पराभूत करण्याची किमया केली. या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वचषकात पुढे जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. आतापर्यंत झालेल्या सर्व टी20 विश्वचषकातील सामन्यात केवळ एकदाच पाकिस्तान भारताला पराभूत करू शकला आहे.
त्यानंतर इंग्लंड येथे निवृत्त खेळाडूंची वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ही स्पर्धा खेळली गेली. या स्पर्धेत साखळी फेरीत पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. मात्र, अंतिम फेरीत या दोन्ही संघांची गाठ पडली. यावेळी मात्र भारतीय संघाने आपला बदला पूर्ण केला. अंतिम फेरीत अगदीच एकतर्फी झालेल्या सामन्यात युवराज सिंग याच्या नेतृत्वातील इंडिया चॅम्पियन्स संघाने पाच गडी राखून ती स्पर्धा आपल्या नावे केली.
बांगलादेश येथे सुरू झालेल्या महिला आशिया चषकात (Womens Asia Cup) देखील पाकिस्तानला पराभूत व्हावे लागले. पाकिस्तान संघ या सामन्यात केवळ 108 धावा करू शकला होता. भारतासाठी स्मृती मंधाना व शफाली वर्मा यांनी 85 धावांची भागीदारी करत पाकिस्तानच्या आव्हानातील हवा काढून टाकली. अखेर भारतीय संघाने या सामन्यात 7 फलंदाज बाकी असताना विजय संपादन केला.
आता भारत आणि पाकिस्तान यांची लढत थेट 2025 चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान होऊ शकते. ही स्पर्धा पाकिस्तानात खेळली जाणार आहे. भारतीय संघ पाकिस्तानात न गेल्यास भारत आपले सामने दुबई अथवा श्रीलंका येथे खेळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याचं भविष्य धोक्यात! टीम इंडिया पाठोपाठ मुंबई इंडियन्सचंही कर्णधारपद जाणार?
एकेकाळी पुढचा ‘सचिन’ म्हटलं जायचं, आता 24व्या वर्षीच संपलं या खेळाडूचं करिअर!
‘आलीशान कार आणि घर, वर्षाला करोडो रुपयांची कमाई’, नव्या कर्णधाराची एकूण संपत्ती जाणून व्हालं थक्क!