एकेकाळी सचिन आणि सेहवागच्या फलंदाजीची झलक आपल्या बँटींग मधून दाखवणाऱ्या या भारतीय संघाच्या स्टार खेळाडूचे 24 व्या वर्षीच क्रिकेट करिअर संपण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. प्रतिभा असतानाही हा धुरंदर क्रिकेटर भारतीय संघातून बाहेर आहे. निवड समिती या खेळाडूकडे भाव देत नाहीये आणि जसे दुधात पडलेली माशी कसे बाहेर काढतो. त्यापद्धतीने या खेळाडूला संघातून बाहेर करण्यात आले आहे. मागील 3 वर्षापासून हा खेळाडू टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडत आहे. पण निवड समिती या खेळाडूला संधी देण्यासाठी तयार नाहीये.
भारतीय संघाची श्रीलंका दाैऱ्याची सुरुवात 27 जुलै पासून होणार आहे. या श्रीलंकेदाैऱ्यामध्ये टीम इंडिया तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये 27 जुलै पासून 30 जुलै पर्यंत टी20 मालिका तर 2-7 ऑगस्ट दरम्यान कोलंबो येथे 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी पृथ्वी शॉची निवड न करून निवडकर्त्यांनी आता या फलंदाजाला टीम इंडियात स्थान नसल्याचे संकेत दिले आहेत.
पृथ्वी शाॅ हा असा फलंदाज जो आपल्या फलंदाजीने सामन्याचे चित्र बदलूल शकतो. परंतु निवडकर्त्यांनी या खेळाडूला पुन्हा खेळाण्याच्या पात्रतेचे नाही समझले. भारताचा हा स्टार खेळाडू विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी योग्य आहे. पृथ्वी शॉ गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने अन्यायाला बळी पडत आहे. शाॅने आतापर्यंत भारतीय संघासाठी 5 कसोटी सामन्यात 339 धावा केल्या आहेत ज्यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी सामन्यात पृथ्वी शाॅचा सर्वाधिक धावसंख्या 134 आहे.
पृथ्वी शाॅने 52 फर्स्ट क्लास सामन्यात 4346 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 13 शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. पृथ्वी शाॅ खूपच आक्रमक फलंदाज आहे. पृथ्वी शाॅ अश्या खेळाडूंमध्ये मोडतो जो कसोटी सामन्यांना एकदिवसीय सामन्याच्या अंदाजात खेळतो. पृथ्वी शाॅच्या फलंदाजीत वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडूलकरची झलक पहायला मिळते. आयपीएल मध्ये पृथ्वी शाॅ 79 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 1892 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याचं भविष्य धोक्यात! टीम इंडिया पाठोपाठ मुंबई इंडियन्सचंही कर्णधारपद जाणार?
हेड कोच गंभीरचे राजकारण? सूर्याला कर्णधार बनवण्यामागे कोणाचं हात? अहवालामध्ये हार्दिकबाबतही मोठा खुलासा
आयपीएलच्या या चॅम्पियन संघावर अदानी ग्रुपची नजर, लवकरच विकत घेणार मालकी हक्क