---Advertisement---

घरबसल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिका ‘फ्री’मध्ये कशी पहायची? जाणून घ्या एका क्लिकवर

On: सोमवार, जून 16, 2025 10:56 PM
---Advertisement---

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. 20 जूनपासून पहिला कसोटी सामना खेळला जाईल. यासाठी भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसेल. या मालिकेसाठी भारतीय संघात बहुसंख्य युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर होईल, तर सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. भारत-इंग्लंड मालिकेचे अधिकृत हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडेच आहेत. परंतु सोनीने या मालिकेचे ओटीटी (OTT) हक्क जिओ हॉटस्टारला विकले आहेत. (India England Cricket Broadcast) त्यामुळे, मोबाईल-लॅपटॉपवर या मालिकेचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला जिओ हॉटस्टारवर जावे लागेल. विशेष बाब म्हणजे, या इव्हेंटसाठी तुम्हाला वेगळा प्लॅन घेण्याची गरज नाही. (Test Match Live Online)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ- शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी: 20-24 जून 2025, हेडिंग्ले, लीड्स (वेळ: दुपारी 3:30)
दुसरी कसोटी: 2-6 जुलै 2025, एजबेस्टन, बर्मिंगहॅम (वेळ: दुपारी 3:30)
तिसरी कसोटी: 10-14 जुलै 2025, लॉर्ड्स, लंडन (वेळ: दुपारी 3:30)
चौथी कसोटी: 23-27 जुलै 2025, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर (वेळ: दुपारी 3:30)
पाचवी कसोटी: 31 जुलै – 4 ऑगस्ट 2025, द ओव्हल, लंडन (वेळ: दुपारी 3:30)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---