दक्षिण कोरियाची राजधानी बुसान येथे सुरू असलेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने आपला विजयरथ कायम राखला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताने इराणचा 33-28 असा पराभव करत सलग चौथा विजय संपादन केला. यासह भारतीय संघाने अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली.
भारत आणि इराण हे सध्या कबड्डी विश्वातील दोन सर्वात मजबूत संघ आणले जातात. पवन सेहरावत याच्या नेतृत्वात या स्पर्धेत खेळत असलेल्या भारतीय संघाला इराणने पहिल्या दहा मिनिटात चांगलीच झुंज दिली. पहिल्या दहा मिनिटात दोन्ही संघ मिळून केवळ नऊ गुण मिळू शकले होते. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने आघाडीची मिळालेली संधी साधत पहिल्या हाफच्या अखेरीस आघाडी 19-9 अशी मोठी केली.
दुसऱ्या हाफमध्ये इराण संघाने देखील पुनरागमन केले. मात्र, कर्णधार पवन व अस्लम इनामदार यांनी आक्रमक चढाया करत, सामन्यात भारताला पिछाडीवर येऊ दिले नाही. बचावात सुरजीत व नितेश यांनी आपला अनुभव पणाला लावत काही शानदार पकडी केल्या. अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अखेर भारताने पाच गुणांनी विजय संपादन केला.
भारताने यापूर्वी स्पर्धेतील आपल्या पहिल्या तीन सामन्यात अनुक्रमे यजमान कोरिया, चायनीज तैपई व जपान यांना पराभूत केले होते. भारताचा अखेरचा सामना हॉंगकॉंग विरुद्ध होणार असून, 30 जून रोजी सायंकाळच्या सत्रात अंतिम सामना खेळला जाईल.
(India Entered In Asian Kabaddi Championship Finals Beat Iran Pawan Sehrawat And Aslam Imandar Shines)
महत्वाच्या बातम्या
आज मिळणार MPL चा महाविजेता! रत्नागिरी-कोल्हापूर अंतिम सामन्यात झुंजणार