---Advertisement---

पाकिस्तानला पोटशूळ! म्हणे भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स; भारतीय चाहत्यांनी केली तोंडे बंद

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 5:21 PM
Afghanistan vs India
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेंबर) दुसऱ्या सामन्यात ब गटातील भारत आणि अफगानिस्तान हे संघ आमने-सामने आले. अबुधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६६ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानच्या काही चाहत्यांनी व पत्रकारांनी हा सामना फिक्स असल्याचे म्हटले. पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध पत्रकाराने या सामन्यावर प्रश्न उपस्थित केल्यावर भारतीय चाहत्यांनी सडेतोड उत्तर देत त्याचे तोंड बंद केले.

पाकिस्तानी पत्रकाराने केले वादग्रस्त ट्विट
भारतीय संघाने या सामन्यात मोठा विजय मिळवून आपला रनरेट उणेवरून अधिकमध्ये नेला. या विजयामुळे पाकिस्तानी चाहत्यांना पोटशूळ उठला. पाकिस्तानी पत्रकार वजाहत काझमी यांनी ‘सामना फिक्स करण्याआधी तुम्ही अभिनय तरी सुधारायला हवा होता.’ अशा आशयाचे ट्विट केले.

https://twitter.com/KazmiWajahat/status/1455961650771726343?t=MB5MnhR9D68kIWpgAjVBfw&s=19

त्यानंतर भारतीय चाहत्यांनी ट्विट करत काझमी यांना चांगलेच फैलावर घेतले. एका चाहत्याने ट्विटमध्ये मोहम्मद आमीरने स्पॉट फिक्सिंग केलेला क्षण पोस्ट करत लिहिले, ‘पाकिस्तानकडून शिका, ते अनुभवातून बोलतात.’

https://twitter.com/AskMeYaaro/status/1455965906362789889?t=4cAiqUpeCoJK3M3LP4cuLQ&s=19

एका चाहत्याने, ‘बस कर आता किती रडणार?’

https://twitter.com/Rahul76407397/status/1455963083667509248?t=DPQnklvr___nHsn_TyK3rQ&s=19

https://twitter.com/_Kartik_KC/status/1455980079763243018?t=3aB1PjQYIBdeTgMMY3MGvA&s=19

भारतीय संघाची उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता वाढली
भारतीय संघाने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्यामुळे भारताच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा वाढल्या आहेत. भारतीय संघाला नामिबिया व नेदरलँड्स विरुद्ध देखील अशाच मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागतील. त्यानंतरही, अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यावर बरेच काही अवलंबून असेल. कारण, या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवल्यास व भारताचा रनरेट त्यांच्यापेक्षा अधिक असल्यास भारत उपांत्य फेरीत प्रवेश करू शकता. या गटामध्ये पाकिस्तानने सलग चार विजय मिळवून उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बॅडमॅन’ गुलशन ग्रोव्हर सोबत ‘सुर्यवंशी’मध्ये झळकणार महेंद्रसिंग धोनी? ‘या’ गोष्टीमुळे चर्चेला उधाण

क्रिकेटमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा राहुल द्रविड एकमेव क्रिकेटपटू

पुढील कर्णधार म्हणून द्रविडची ‘या’ दोन नावांना पसंती; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---