बर्मिंघम| बुधवारी (०३ ऑगस्ट) भारत विरुद्ध बार्बाडोस महिला संघात ऍजबस्टन येथे कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील दहावा सामना खेळला गेला. उभय संघांसाठी उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला विशेष प्रदर्शन करता आले नाही. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १६२ धावा केल्या. त्यामुळे बार्बाडोसला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान मिळाले आहे.
भारताकडून जेमिमाह रोड्रिगेस हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने चिवट झुंज देत अर्धशतक झळकावले. ४६ चेंडू खेळताना १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५६ धावांवर ती नाबाद राहिली. तसेच सलामीवीर शेफाली वर्मा हिनेही झंझावाती खेळी केली. मात्र फक्त ७ धावांनी तिचे अर्धशतक हुकले. तिने २६ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली. तसेच दिप्ती शर्मा हिनेही नाबाद ३४ धावांचे योगदान दिले.
A fine half-century from Jemimah Rodrigues as India put up a competitive total 👌
Can they defend this?#B2022 | 📝 Scorecard: https://t.co/lTdFGj3kT8 pic.twitter.com/lgrPNhYESV
— ICC (@ICC) August 3, 2022
या डावात बार्बाडोसकडून शकिरा सेलमान, शनिका ब्रूस आणि कर्णधार हिली मॅथ्यूज यांनी किफायतशीर गोलंदाजी केली. शनिकाने भारताची सलामीवीर स्म्रीती मंधानाची (०५ धावा) मोठी विकेट मिळवून दिली. तर शकिरानेही भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला शून्यावर केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितनंतर सलामीवीर म्हणून टी२०त स्म्रीतीचाच बोलबाला, बनलीये पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर
रोहितच्या अनुपस्थितीत ‘हे’ ३ खेळाडू सांभाळू शकतात सलामीची जबाबदारी, एकाला तर दांडगा अनुभव
एशिया कप जिंकण्यासाठी कर्णधार रोहित लावणार जोर, असा असू शकतो तगडा भारतीय संघ