---Advertisement---

सर्वाधिक वेळा डावाने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत भारत आता चौथा

On: शनिवार, ऑक्टोबर 6, 2018 6:47 PM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा घरच्या मैदानावरील विजयाचा सिलसिला चालूच आहे. भारताने विंडिजवर एक डाव आणि 272 धावांनी आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. भारताने हा सामना अडीच दिवसात जिंकला आहे.

भारताचा हा 528 वा कसोटी सामना होता. भारतीय संघाने 147 वा  विजय मिळवला असून,164 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक सामना बरोबरीत सुटलेला आहे, तर 216 सामने अनिर्णित राखण्यात भारतीय संघाला यश आले आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने 42 वेळा डावाने विजय मिळवला आहे. 42 सामन्यात डावाने विजयासह भारत आता या यादीत चौथ्या स्थानावर पोहचला आहे. भारताने विंडिजचा पराभव करत त्यांचाच 41 वेळचा डावाने विजयाचा विक्रम मोडला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये डावाने विजय मिळवण्यात इंग्लडचा संघ आघाडीवर आहे. इंग्लंडच्या संघाने सर्वाधिक 104 वेळा डावाने विजय मिळवला आहे. या संघाने 1004  कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने 91 सामन्यात डावाने विजय मिळवले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण अफ्रिकेने 46 वेळा डावाने विजय मिळवला आहे.

कसोटीत सर्वाधिक वेळा डावाने विजय मिळवणारे संघ –

104- इंग्लड

91- ऑस्ट्रेलिया

46- दक्षिण अफ्रिका

42-  भारत

41- विंडिज

29- पाकिस्तान

24- न्युझीलंड

21- श्रीलंका

02- झिम्बाॅब्वे

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment